husband attacks on wife  Saam tv
देश विदेश

खळबळजनक! बायको हॉस्पिटलमध्ये बेडवर, नवरा अचानक रुममध्ये शिरला, क्षणात भयंकर घडलं

husband attacks on wife : नवऱ्याने हॉस्पिटलमध्ये दाखल बायकोवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत बायको गंभीर जखमी झाली आहे.

Vishal Gangurde

मध्य प्रदेशमध्ये नवऱ्याने हादरवणारं कृत्य

नवऱ्याकडून दाखल बायकोवर जीवघेणा हल्ला

पोलिसांकडून आरोपी नवऱ्याला अटक

मध्य प्रदेशमध्ये नवऱ्याने हादरवणारं कृत्य केलं आहे. नवऱ्याने रुग्णालयात दाखल बायकोवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. नवऱ्याने रुग्णालयात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बायकोवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नवऱ्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला एका वॉर्डमध्ये खासगी रुममध्ये दाखल केलं होतं. तर सायंकाळी तिचा नवरा अचानक तिच्या रुग्णालयातील रुममध्ये शिरला. त्यानंतर नवऱ्याने रुमचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर पीडित महिलेने आरडाओरड करायला सुरुवात केली. तिने रुगणालय प्रशासनाला मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केली.

आरडाओरड सुरु केल्याने रुममध्ये शिरलेल्या नवऱ्याने बायकोला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून काही जण मदतीला धावत दरवाजा ठोकायला सुरुवात केली. त्यावेळी घाबरून नवऱ्यानं चाकूने बायकोवर ४ ते ५ वेळा जीवघेणा वार केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर महिलेचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षकाने बळाचा वापर करून दरवाजा तोडला. त्यानंतर आरोपी नवऱ्याला ताब्यात घेतलं.

रुग्णालय प्रशासनाने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर शहडोल पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी सूर्य प्रकाश पांडेय याला ताब्यात घेतलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पांडेय याची चौकशी सुरू आहे. आरोपीला कोर्टात सादर केलं. तर दुसरीकडे पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मनोरमा उपाध्याय असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे महिलेवर हल्ला झाल्यानंतर नागरिकांकडून आरोपीवर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

Tuesday Horoscope : प्रेम, पैसा आणि यश मिळणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू

धनूभाऊंनी दिली जरांगेंची सुपारी? जरांगेंच्या घातपातासाठी अडीच कोटींची डील?

Maharashtra Live News Update: मीरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात मध्यरात्री तरुणांचा दारू पिऊन धिंगाणा

SCROLL FOR NEXT