Real Estate Developer Shoots Himself  Saam TV News
देश विदेश

Shocking: प्रसिद्ध व्यावसायिकानं गोळ्या झाडून स्वत:ला संपवलं; फेसबुक लाईव्हवर सांगितलं आत्महत्येचं कारण

Real estate developer shoots himself due to debt: शाजेब शकील या रिअल इस्टेट व्यावसायिकाने फेसबुकवर लाईव्ह येत स्वतःवर गोळी झाडली. ३० कोटींची मदत मागत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रिअल इस्टेट व्यावसायिकाने स्वत:वर बंदुकीने गोळी झाडून हत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी फेसबुकवर व्हिडिओ शूट केला. तसेच सोशल माध्यमांमध्ये शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये व्यावसायिकाने आत्महत्येची कारणं स्पष्ट केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

शाजेब शकील (वय वर्ष ३५) असे आत्महत्या करणाऱ्या रिअल इस्टेट व्यावसायिकाचे नाव आहे. ते लखनऊ येथील विकासनगरचे रहिवासी होते. शाजेबवर १५ कोटींहून अधिक रूपयांचे कर्ज होते. यामुळे अडीच वर्षांपासून ते मानसिक तणावाखाली होते. आत्महत्या करण्यापूर्वी शाजेब यांनी फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीम करत काही गोष्टी शेअर केल्या.

'मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे. मी पूर्णपणे शुद्धीवर आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मी नैराश्यात आहे. या काळात मी काही आर्थिक निर्णय घेतले होते. जे अत्यंत चुकीचे ठरले आहेत. काही लोकांनी मला पाठिंबा दिलेला नाही. मी अडकत राहिलो', फेसबुकवर शाजेबचं म्हणणं ऐकून त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या गार्डला बोलावून घेतलं. नंतर स्वत: तिथे गेले. दरम्यान, शाजेबने गोळी झाडून मृत्यूला कवटाळलं.

या घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. गुडंबा पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. तसेच पोलिसांनी बंदूकही जप्त केली.

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाजेबने एमएमआयसी नावाची स्वत:ची कंपनी स्थापन केली. बुधवारी दुपारी ते कार्यालयात पोहोचले होते. त्यांना त्यांच्या पार्टनरसह बाराबंकी येथील बांधकाम साईटवर जायचं होतं. नंतर ते स्वत: गेले. शाजेबने त्यावेळी खासगी सुरक्षा रक्षकाला शटर अर्धवट करून थंड पाणी आणायला पाठवले. या दरम्यान, शाजेबनं फेसबुक लाईव्ह सुरू करत आर्थिक अडचणींबद्दल सांगितले.

त्यांनी लाईव्हमध्ये, सुमारे १५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं असल्याचं सांगितलं. एकूण २५ ते ३० कोटींची आर्थिक मदत मिळाल्यास त्याचं कुटुंब संकटातून बाहेर येईल. त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान, उद्योजक आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडेही मदत मागितली. यानंतर सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीने स्वत:वर गोळी झाडली. दरम्यान, गुडंबा पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी सांगितलं की, कुटुंबाने अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही. तक्रार मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT