
नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंढेगाव फाट्याजवळ सिमेंट पावडरचा कंटेनर इको व्हॅनवर उलटली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून, सर्वजण मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी होते. गुरूपौर्णिमेनिमित्त प्रवासी मठात गेले होते. दरम्यान, परतीच्या प्रवासादरम्यान, वाहनाचा अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील रहिवासी गुरूपौर्णिमेनिमित्त मुंढेगाव फाट्याजवळील रामदास बाबांच्या मठात गेले होते. दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईची वाट धरली. मात्र, अंधेरी गाठण्यापूर्वी त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात घडला. मुंढेगाव फाट्यावर त्यांच्या इको व्हॅनवर अचानक सिमेंट पावडरचा कंटेनर कोसळला.
झटक्यात वाहन सिमेंट पावडरच्या कंटेनरखाली दबली गेली आणि कंटेनर पुढे फरपटत गेला. अपघात एवढा भीषण होता की, सर्वजण व्हॅनच्या आतील भागात दबले गेले. चार प्रवाशांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच घोटी पोलिस, महामार्ग पोलिस, टोल नाक्याची टीम घटनास्थळी दाखल झाली.
यानंतर क्रेनच्या सहाय्याने कारमध्ये दबलेले मृतदेह बाहेर काढण्यास आले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातानंतर महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नंतर परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.