
विधानपरिशषदेत पुन्हा एकदा 'गद्दार' या शब्दावरून वातावरण चांगलंच तापलं. शिवसेना (ठाकरे गट) विरूद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी गद्दार म्हणताच मंत्री शंभुराज देसाई यांनी जशाच तसे उत्तर दिलं. 'तु बाहेर ये तुला दाखवतो', अशी भाषा त्यांनी वापरली. यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटं तहकूब करण्यात आलं होतं. सध्या खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अनिल परब यांनी विधानपरिषदेत म्हटलं की, 'मराठी माणसाला प्राधान्यानं घर मिळायाल हवं, असा कायदा तयार करा, PAPसाठी कायदा करता, SC STसाठी कायदा आहे, नवनवीन रिडेव्हलपमेंट होते, ४० टक्के घरं मराठी माणसाला परवडतील अशी बांधण्यासाठी आपण कायदा करणार आहात का? इच्छा फक्त सभागृहात बाहेर गेलं की, व्यावसायिकांची दादागिरी सुरू होते..', असं अनिव परब म्हणाले.
'कायदा केल्याशिवाय मराठी माणसाला न्याय मिळणार नाही. प्रत्येक मराठी माणसाचं अधिवेशनाकडे लक्ष असतं. तुम्ही आता या संदर्भात कायदा करणार आहात का? मराठी माणसाला घर देण्यासाठी ४० टक्केची अट टाकून कायदा आणणार आहात का?', असा सवाल परब यांनी उपस्थित केला.
परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं. 'परब साहेबांनी ज्या काही प्रकल्पासंदर्भात मराठी माणसांसाठी पोटतिडकीनं भूमिका मांडली, तीच भूमिका महायुती सरकारची आहे. पण चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. २०१९ ते २०२२ या काळात असा काही नियम केला होता का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.'महाविकास आघाडीच्या काळात तुम्ही जे काही केलंय ते रेकॉर्डवर येतंय, ते तुम्हाला ऐकवत नाही का?' असा प्रतिप्रश्न शंभुराज देसाईंनी केला.
यावेळी विधीमंडळात एकच गदारोळ झाला. '२०१९ ते २०२२ मध्ये आम्ही काय काय करत होतो, सांगू का?' असं म्हणताच परब यांनी 'गद्दारी करत होते' असं म्हटलं. यानंतर देसाई संतापले, परब यांचा एकेरी उल्लेख करत धमकी दिली, 'काय गद्दारी सांगतो, कुणाला गद्दार म्हणतोस, बाहेर ये तुला दाखवतो, च्यायला गद्दार कुणाला म्हणतोस..', अशा शब्दात त्यांनी परब यांना सुनावलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.