डॉक्टरला लॉजमध्ये नेलं, अत्याचार करून व्हिडिओ शूट, शरीरसंबंधासाठी नकार देताच व्हायरल; पुण्यातील तरूण अटकेत

Shocking Pune Crime: नवी मुंबईतील खारघर येथे डॉक्टरवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार; आरोपीने व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
Shocking Pune Crime
Shocking Pune CrimeSaam TV News
Published On

नवी मुंबईतील खारघर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खारघरमधील एका २८ वर्षीय महिला डॉक्टरवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती खारघर पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. यासह तरूणीचे त्याच्या मोबाईमधून अश्लील व्हिडिओही जप्त केले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडित तरूणी (वय वर्ष २८) डॉक्टर असून, ती नवी मुंबईतील खारघर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर, आनंद गते, असे आरोपीचे नाव आहे. तो पुण्यातील भिमाशंकर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दोघांची सोशल मीडियावरून ओळख झाली. दोघांमध्ये दररोज संवाद व्हायचा. त्यानंतर आरोपी पुण्याहून खारघरला आला. त्याने पीडितेला कोल्डड्रिंग दिली. कोल्डड्रिंगमध्ये त्यानं गुंगीचे औषध मिसळलं होतं.

Shocking Pune Crime
Film Industry: सिनेइंडस्ट्री ED च्या रडारावर, तब्बल २९ सेलिब्रिंटींवर मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय ?

यानंतर तरूणी बेशुद्ध पडली. आरोपीने पीडितेला साताऱ्यातील लॉजमध्ये नेले. तसेच तिच्यावर जबरदस्ती केली आणि लैंगिक अत्याचार केला. यावेळी आरोपीने मोबाईलवरून बलात्कार करताना व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर तरूणीला या व्हिडिओवरून धमकी देण्यास सुरूवात केली. आरोपी वारंवार तरूणीवर लैंगिक अत्याचार करीत होता.

पण सततच्या धमक्यांना तरूणी कंटाळली. तिने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. आरोपीने थेट तरूणीच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून तरूणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. यानंतर तरूणीने थेट खारघर पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला जाळ्यात अडकवण्यासाठी सापळा रचला. तसेच त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Shocking Pune Crime
Pune: चटका लावणारा अंत! ड्युटीवर असताना छातीत कळ; वाहतूक पोलिसाचा हार्ट अटॅकनं मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com