shocking x
देश विदेश

Shocking : नववीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या शौचालयात दिला बाळाला जन्म, सरकारी निवासी शाळेत भयंकर घडलं

Shocking News : कर्नाटकमधील एका सरकारी निवासी शाळेतील गंभीर प्रकार समोर आला आहे. या शाळेत एका नववीतील विद्यार्थिनीने शाळेच्या शौचालयात बाळाला जन्म दिला आहे.

Yash Shirke

  • सरकारी निवासी शाळेत नववीच्या विद्यार्थिनीने शौचालयात बाळाला जन्म दिल्याने खळबळ उडाली आहे.

  • अल्पवयीन आई आणि नवजात बाळ सुरक्षित असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • या प्रकरणी मुख्याध्यापक, वॉर्डन आणि अन्य जबाबदार व्यक्तींवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shocking Incident : एका सरकारी निवासी शाळेतील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रात्री उशिरा शाळेच्या शौचालयात मुलाला जन्म दिला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रशासनाने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. पीडित मुलगी आणि तिचं बाळ सुरक्षित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सदर घटना कर्नाटकमधील यादगीर जिल्ह्यात घडली आहे.

कर्नाटक राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य कोसुंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यादगीर जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेत नववीच्या विद्यार्थिनीने गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० च्या सुमारास शाळेच्या शौचालयात एका बाळाला जन्म दिला. आयोगाने या प्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. जिल्हा बाल हक्क संरक्षण अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा दंडाधिकारी हर्षल भोयर तात्काळ अल्पवयीन आई आणि नवजात बाळावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात पोहोचले. 'संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आणि तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शाळेतील कर्मचारी आणि वॉर्डनचा निष्काळजीपणा समोर आला आहे', असे भोयर यांनी म्हटले.

पोलीस अधीक्षक पृथ्वीक शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर प्रकरणात मुख्याध्यापक, वॉर्डन, स्टाफ नर्स आणि पीडितेच्या भावाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासानंतर संबंधिक कलमांमध्येही भर घातली जाईल. पीडितेचे वय तिच्या शैक्षणिक कागदपत्रांनुसार १७ वर्षे आहे. रुग्णालयाच्या भेटीत डीसी आणि एसपींसह मुख्य कार्यकारी अधिकारी लविश ओर्डिया उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT