Mathura Saam
देश विदेश

Mathura: मथुरेत मोठी दुर्घटना! खोदकामावेळी ५-६ घरे कोसळली; १२ जण ढिगाऱ्याखाली, एकाचा मृत्यू

Mathura Excavation Turns Fatal: मथुरामध्ये उत्खननादरम्यान सहा घरे कोसळली. एकाचा मृत्यू, १२ जण अडकल्याची भीती. एनडीआरएफ आणि प्रशासन युद्धपातळीवर बचावकार्य करत असून चार जणांना वाचवण्यात यश.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील गोविंद नगर पोलीस स्टेशन परिसरातील माया टीला शाहगंज येथे उत्खननादरम्यान मोठी दुर्घटना घडली. खोदकामावेळी ५-६ घरे कोसळली असून, किमान १२ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.

सध्या घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी तातडीने पोहोचले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पथके ढिगारा हटवण्याचे आणि अडकलेल्या लोकांना शोधण्याचे काम करीत आहेत. सीओ सीटी भूषण वर्मा म्हणाले, 'मसानी पोलीस स्टेशन परिसरात आम्हाला एक इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. सध्या ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. महापालिकेचे एक पथक जेसीबीसह घटनास्थळी उपस्थित आहे.

ढिगाऱ्याखाली आणखी किती लोक अडकले आहेत, याचा तपास सुरू आहे', अशी माहिती त्यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या वादळामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्खननाच्या वेळी सुमारे सहा घरे कोसळल्याचीही माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TDR File Approval : महापालिकेची मोठी घोषणा! टीडीआर प्रक्रिया आता फक्त ९० दिवसात, 'या' तारखेपासून नियम लागू होणार

Peanut Chutney Recipe : नाश्त्याला बनवा शेंगदाण्याची झणझणीत ओली चटणी; डोसा,वडा,इडलीची चव वाढवेल

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Mozambique Accident : मोठी दुर्घटना, समुद्रात बोट उलटली, ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

SCROLL FOR NEXT