Groom Dies in Accident While Buying Gift for Bride Saam Tv
देश विदेश

Shocking News: बायकोसाठी गिफ्ट आणायला गेला, परत आलाच नाही; लग्नानंतर २४ तासांत कंकू पुसलं

Groom Dies in Accident While Buying Gift for Bride: लग्नाच्या पहिल्याच दिवशी बायकोसाठी गिफ्ट खरेदी करायला गेलल्या तरुणाचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मध्य प्रदेशमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

मध्य प्रदेशातील शहडोलमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोसाठी गिफ्ट आणायला गेलेल्या तरुणाचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नाच्या २४ तासांतच नवविवाहित वधू विधवा झाली. या घटनेमुळे नवरदेव आणि नवरीच्या घरात शोककळा पसरली आहे. आनंदाचे वातावरण असलेल्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. नवरी तर रडून रडून बेहाल झाली आहे.

शहडोलच्या झिरिया गावामध्ये राहणाऱ्या दीपेंद्रचे लग्न झाले होते. सीधी जिल्ह्यातील मगरोहर गावातील तरुणीशी त्याचे लग्न झाले होते. लग्नानंतर तो आपल्या बायकोला घरी घेऊन आला. घरामध्ये नवी नवरी आल्यानंतर सर्व विधी सुरू होते. त्याचवेळी दिपेंद्र लग्नाच्या पहिल्याच रात्रीसाठी आपल्या बायकोला गिफ्ट आणण्यासाठी घराबाहेर पडला. सासऱ्याने लग्नामध्ये दिलेल्या बाईकवरून तो जात होता. त्याचवेळी मोठा अनर्थ घडला.

दीपेंद्र त्याच्या बायकोसाठी लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी भेटवस्तू घेण्यासाठी गावापासून १० किमी अंतरावर असलेल्या बयाहारी येथे गेला होता. त्याने बायकोसाठी सोन्याचे लॉकेट आणि चांदीचे पैंजन विकत घेतले. त्यानंतर तो बाईकवरून परत घराच्या दिशेला निघाला. याच दरम्यान घराच्या एक किमी अंतरावर सराई सांधा येथे त्याच्या बाईकला भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या भरधाव बाईकने त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली. त्या बाईकवरून दोघेजण प्रवास करत होते.

हा अपघात इतका भीषण होता की, दीपेंद्र आणि दुसऱ्या बाईकचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. दीपेंद्रच्या मृत्यूची बातमी त्याच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. लग्नाच्या २४ तासांच नवरदेवाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. दिपेंद्रचे कुटुंबीय आणि सासरच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच बयावरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : शाईऐवजी स्केच पेनचा वापर; मनसे उमेदवाराचा खळबळजनक आरोप

Dhule Tourism : थंडीत अजूनही ट्रेकिंगला गेला नाहीत? मग 'हे' ठिकाण तुमच्यासाठी ठरेल खास

Municipal Election : मोठी बातमी! मतदार यादीत घोळ, मंत्र्यांचेच नाव मतदार यादीत नाही, नवी मुंबईमध्ये गोंधळ

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी बळीराजाच्या खात्यात ₹२००० जमा होण्याची शक्यता

मोठी बातमी! मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला, मनसे उमेदवारासमोर भंडाफोड, वाचा नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT