UP Panchayat Husband Divided Between Two Wifes Saam Tv
देश विदेश

Shocking: २ बायकांमध्ये नवऱ्याचं विभाजन, एकीसोबत ३ तर दुसरीसोबत ३ दिवस राहणार; रविवारी तरुणाला मिळणार सुट्टी

UP Panchayat Husband Divided Between Two Wifes: उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाचे दोन बायकांमध्ये विभाजन केले. नवरा एका बायकोसोबत ३ तर दुसरीसोबत ३ दिवस राहणार. तर रविवारी त्याला सुट्टी मिळणार आहे.

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील गाव पंचायतने घेतला अनोखा निर्णय

  • नवरा एका बायकोकडे ३ दिवस आणि दुसऱ्याकडे ३ दिवस राहणार

  • रविवारी नवऱ्याला सुट्टी देण्याचा निर्णय पंचायतीने घेतला

  • भविष्यातील वाद टाळण्यासाठी करार लेखी स्वरूपात करण्यात आला

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे ज्या घटनेने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. एका तरुणाला दोन बायका असून त्यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचे. हे प्रकरण थेट पंचायतीपर्यंत गेले. त्यानंतर पंचायतीसमोर मोठा निर्णय घेण्यात आला. थेट दोन बायकांमध्ये नवऱ्याचे विभाजन करण्यात आले. नवरा एका बायकोकडे ३ दिवस राहणार तर दुसऱ्या बायकोकडे ३ दिवस राहणार असा निर्णय घेण्यात आला आहे. तर आठवड्यातील रविवारी या नवऱ्याला सुट्टी असणार आहे. आठवड्याचे त्याचे वेळापत्रक देखील ठरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील अझीमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागलिया अकिल गावातील आहे. मुस्लिम समाजातील एका तरुणाला दोन बायका होत्या. त्याचे अरेंज मॅरेज झाले होते. त्यानंतर त्याला आणखी एकीसोबत प्रेम झाले त्याने दुसरे लग्न केले. हा तरुण दोन्ही बायकांना घेऊन एकाच घरात राहत होता. रुवातीला सगळं काही व्यवस्थित चाललं होतं.पण हळूहळू दोन्ही बायकांमध्ये नवऱ्याला सोबत ठेवण्यावरून वाद होऊ लागले. वाद इतका वाढला की कुटुंबातील शांती हिरावून घेतली गेली आणि प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले.

पोलिसांपर्यंत तक्रार पोहोचल्यानंतर, सामाजिक पातळीवर प्रकरण सोडवण्यासाठी गाव पंचायत बोलावण्यात आली. पंचायत सदस्यांनी नवरा आणि बायको या तिघांचे म्हणणे ऐकले. वाद सोडवण्यासाठी, पंचायतीने एक अनोखा निर्णय घेतला. थेट दोन बायकांमध्ये नवऱ्याचे विभाजन केले. त्यांना दिवस वाटून देण्यात आले. पहिले ३ दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार तरुण पहिल्या बायकोसोबत राहील. त्यानंतर पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार नवरा दुसऱ्या बायकोसोबत राहिल.

महत्वाचे म्हणजे, रविवारी तरुणाला सुट्टी देण्यात आली आहे. म्हणजेच रविवारी तो एकटाच राहिल. दोन्ही बायकांपासून तो दूर त्याच्या मनाप्रमाणे रविवारी राहिल. पंचायतीने विशेष परिस्थितीसाठी एक दिवस आगाऊ किंवा पुढे ढकलण्याची परवानगी देखील दिली आहे. भविष्यातील वाद टाळण्यासाठी हा करार लेखी स्वरूपात नोंदवण्यात आला आहे. या करारावर तिघांनीही सह्या केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: फक्त 198 रुपयांत 28GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; Jio चा स्वस्त प्लॅन

Maharashtra Live News Update: तांबाळा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवार यांचा अपहरण झाल्याचा संशय

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण; १३१ जण पद्म पुरस्काराने सन्मानित,वाचा संपूर्ण यादी

Appam Recipe : साउथ स्टाइल मऊ-जाळीदार अप्पम घरी कसं बनवाल? वाचा खास रेसिपी

shocking : सरपंच सासू अन् मुख्याध्यापक सासऱ्याचा जाच असह्य झाला; पुण्याच्या दीप्तीने मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT