Madhya Pradesh Crime Saam Tv
देश विदेश

Crime: आईनं पोटच्या मुलीला धावत्या ट्रेनसमोर फेकलं; कारण वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल, CCTV पाहून पोलीस हादरले

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशमध्ये एका महिलेने आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली. या महिलेने रेल्वे स्थानकावर नेऊन मुलीला धावत्या ट्रेनसमोर फेकून दिलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला. पोलिसांनी महिलेला अटक केली.

Priya More

Summary -

  • आईने ८ वर्षांच्या मुलीला ट्रेनसमोर ढकलले

  • मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना

  • सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य उघड झाले

  • आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली

मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. एका महिलेने आपल्या पोटच्या ८ वर्षांच्या मुलीला धावत्या ट्रेनसमोर फेकून दिलं. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नर्मदापुरम रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. मुलीला स्वत: ट्रेनसमोर ढकलून देऊन महिलेने नंतर रडण्याचे नाटक केले. शेवटी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेचा खरा चेहरा समोर आला. या घटनेमुळे मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. एक महिला आपल्या ८ वर्षांच्या मुलीला घेऊन नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर आली. ती ट्रेनची वाट पाहत होती. ही महिला जवळपास दोन ते तीन तास प्लॅटफॉर्मवर मुलीला घेऊन फिरत होती. प्लॅटफॉर्मवर फिरता फिरता या महिलेने मुलीला ट्रेनसमोर ढकलून दिलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले सर्वजण घाबरले.

या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मुलीची प्रकृती चिंताजनक होती. तिला प्राथमिक उपचार दिल्यानंतर भोपाळला हलवण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. युविका राजपुत (८ वर्षे) असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव होते. तर अंजू सिंह राजपूत असे तिच्या आईचे नाव आहे. अंजू कृषी विभागात क्लर्क म्हणून काम करते. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तपासाला सुरूवात कली. या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यांना हादरला बसला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते की, ट्रेन रेल्वे स्थानकावर येताच अंजूने आपल्या मुलीला ट्रेनसमोर ढकलून दिलं. मुलीला ट्रेनसमोर ढकलल्यानंतर अंजू तिथेच उभी राहिली आणि पाहत राहिली. ट्रेन गेल्यानंतर अंजू प्लॅटफॉर्मवर उतरतून जोरजोरात ओरडू लागली. मुलगी अपघातामध्ये जखमी झाल्याचे पाहून रडून आणि जोरजोरात ओरडून ती नाटक करत होती. पण खरं तर तिनेच आपल्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी तिचा ताब्यात घेत चौकशी केली असता धक्कादायक कारण समोर आले. अंजूला दुसरं लग्न करायचं होतं आणि तिची ८ वर्षांची मुलगी अडथळा बनली होती. त्यामुळे तिने आपल्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : भीषण अपघात! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली, एकाचा जागीच मृत्यू तर अनेक गंभीर जखमी

Salted Peanuts Benefits : हृदयापासून ते वजन कंट्रोल करण्यापर्यंत, मूठभर खारट शेंगदाणे ठरतात वरदान

Cabinet Expansion: मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख समोर, शिंदे खासदारांसह दिल्ली दौऱ्यावर; कुणाला मिळणार मंत्रिपद?

Maharashtra News Live Update: पुण्यात नारायपेठमध्ये अपघात

8th Pay Commission Recruitment : 8 व्या वेतन आयोगात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 1.80 लाखांपर्यंत मानधन, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT