Uttar pradesh crime news Saam Tv News
देश विदेश

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

Builder Abducted and Assaulted: हापुडमध्ये बांधकाम व्यावसायिकावर अमानुष अत्याचार; खुर्चीला बांधून दोन तास छळ. आरोपींनी पीडिताच्या अंगावर लघवी केली; गुप्तांगांवर काठीनं हल्ला.

Bhagyashree Kamble

  • हापुडमध्ये बांधकाम व्यावसायिकावर अमानुष अत्याचार; खुर्चीला बांधून दोन तास छळ.

  • आरोपींनी पीडिताच्या अंगावर लघवी केली; गुप्तांगांवर काठीनं हल्ला.

  • पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास पाच दिवस घेतले.

  • घटनेचा व्हिडीओ आरोपींनी काढला; पोलिसांना धमकी देण्यात आली होती.

उत्तर प्रदेशातील हापुड शहरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला खुर्चीला बांधून सुमारे दोन तास बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर आरोपींनी त्यांच्यावर लघवी केली आणि गुप्तांगांवर काठीनं अमानुषपणे मारहाण केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पवन कुमार असे पीडित बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. ते हापुड येथील सुभाष विहार कॉलनीचे रहिवासी आहेत. पीडित बिल्डरनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एक कर्मचारी काम करत होता. बिल्डरनं त्या कर्मचाऱ्यावर त्याच्या ऑफिसमधून एक लाख रूपये आणि पाच लाख रूपयांचे दागिने चोरल्याचा आरोप केला होता.

यानंतर बिल्डरनं शहर पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. दरम्यान, आरोपी कर्मचारी फरार झाला. त्यानंतर २७ जुलै रोजी त्यांना एक फोन आला. त्यानं स्वत:ची ओळख फरार कर्मचाऱ्याचा मित्र म्हणून ओळख करून दिली. तसेच चोरी उघड करण्यास मदत करण्याची ऑफर दिली. त्यानं व्यावसायिकाला मोदीपोन कॉलनीत बोलावून घेतलं.

बिल्डरनं आरोप केला की, सातहून अधिक आरोपींनी त्यांना कॉलनीतील एका खोलीत डांबून ठेवलं, खूर्चीला बांधून ठेवलं. बंदुकीचा धाक दाखवून बेल्टनं मारहाण केली. तसेच अंगावर लघवी आणि गुप्तांगावर काठीनं मारल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केली. या घटनेदरम्यान, आरोपींनी व्हिडिओही शूट केला.

यावेळी आरोपींनी पोलीस ठाण्यात तक्रार न करण्याची धमकीही दिली. मात्र, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेला पाच दिवस उलटूनही पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकानं केला. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunickaa Sadanand: 'सलमानला सपोर्ट केल्यामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या...', बिग बॉस १९मधील कुनिकाचा धक्कादायक खुलासा

बलात्काराची धमकी, २३ लाखांची खंडणी; हनी ट्रॅपमध्ये क्लब मालक अडकला, शेवटी संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update: दोन गटातील राड्यानंतर धाराशिवच्या मोहा गावाला छावणीचे स्वरूप

Parle G In America: अमेरिकेत किती रुपयांना मिळतो Parle-G, किंमत ऐकून बसेल धक्का

Ropeway: सार्वजनिक वाहतुकीसाठी आता रोपवे; कुठे आणि कधीपासून होणार सुरू? तिकीट किती असणार?

SCROLL FOR NEXT