देश विदेश

Shocking: धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलाची हत्या केली, मृतदेह पोत्यात भरून घराच्या गेटवर लटकवला, नेमकं प्रकरण काय?

Uttar Pradesh Crime: गुरुवारी उत्तर प्रदेशच्या आझमगडमधील सिधारी पोलिस स्टेशनजवळ एका सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह त्याच्या घराजवळ वायरला पोत्यात लटकलेला आढळला. पोलीस घटनेची चौकशी सुरू केली आहे.

Dhanshri Shintre

  • आझमगढमध्ये ७ वर्षांच्या साहेब आलमची निर्घृण हत्या करून मृतदेह पोत्यात लटकवण्यात आला.

  • मुलगा बेपत्ता झाल्यानंतरही पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

  • मुख्य आरोपी शैलेंद्र निगम व त्याचा भाऊ गोळीबारानंतर अटक झाले.

  • व्यवसायिक वैरातून ही भीषण हत्या केल्याचे आरोपींनी कबूल केले.

उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील पठाण टोला परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि निर्घृण घटना समोर आली आहे. फक्त सात वर्षांच्या मुलाची निर्दयतेने हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून घराजवळ लटकवण्यात आला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पठाण टोला येथील रहिवासी मुकर्रम अली यांचा मुलगा साहेब आलम हा बुधवारी संध्याकाळी घराबाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्या रात्री उशिरापर्यंत मुलगा परत न आल्याने त्यांनी पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी, गुरुवारी दुपारी, घराजवळच पोत्यामध्ये लटकवलेला साहेबचा मृतदेह आढळताच परिसरातील लोकांमध्ये धावपळ उडाली.

घटनास्थळी तात्काळ पोलिस, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि स्थानिक तपास पथक पोहोचले. ज्या जागी मुलाचा मृतदेह लटकवण्यात आला होता, त्याच्या शेजारील घरात पोलिसांना रक्ताचे डागही सापडले. या संशयास्पद पुराव्यामुळे तपासाचे सूत्र शेजाऱ्यांवर केंद्रित झाले आहे.

साहेब आलमच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या शैलेंद्र निगम याच्यावर थेट खुनाचा आरोप केला आहे. मृतदेह शेलेंद्रच्या घराजवळ लटकवला गेल्याने कुटुंबाने पोलिसांवरही गंभीर निष्क्रियतेचा आरोप लावला. कुटुंबाचा दावा आहे की, मुलाचा मृतदेह सापडण्यापूर्वीच त्यांना खंडणीसाठी फोन आला होता. त्याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती, तरीदेखील त्यांनी सक्रिय तपास केला नाही, अशी तक्रार कुटुंबीयांच्या बाजूने करण्यात आली.

या घटनेचा निषेध म्हणून स्थानिक लोकांनी दुकाने बंद ठेवत रस्त्यावर आंदोलन केले. वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी पोलिसांनी कारवाईची गती वाढवत शैलेंद्र निगम उर्फ मंटू आणि त्याचा धाकटा भाऊ राजा यांना इटौरा येथील डेंटल कॉलेजजवळ घेरून पकडले. या चकमकीदरम्यान गोळीबार झाला ज्यात शैलेंद्रच्या पायाला दोन गोळ्या आणि संदीपला एक गोळी लागली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.

या प्रकरणात चौकशीदरम्यान आरोपींनी व्यावसायिक शत्रुत्वामुळे हा खून केल्याची कबुली दिली आहे. मुकर्रम अली आणि शैलेंद्र निगम यांची दोन्ही हार्डवेअर दुकाने एकमेकांच्या शेजारी असल्याने व्यवसायातील वादातून ही जीवघेणी कारवाई घडवली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक चिराग जैन यांनी सांगितले की, गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून आरोपींच्या सखोल चौकशीला सुरुवात झाली आहे. या निर्घृण घटनेमुळे संपूर्ण आझमगढ हादरले आहे आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट; होडगी रोड पाण्याखाली

पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

SCROLL FOR NEXT