Widow Harrasment Crime Saam Tv News
देश विदेश

Widow Women: विधवा महिलेला लग्नासाठी धमकी, नकार देताच प्रायव्हेट व्हिडिओ मुलाला पाठवला; हातोड्यानेही फोडलं

Widow Harassed and Family Attacked: नवादा जिल्ह्यात विधवा महिलेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने गावात दोन गटांत हाणामारी झाली. तीन जण जखमी. पोलीस तपास सुरू असून आरोपी फरार झाला आहे.

Bhagyashree Kamble

बिहारच्या नवादा जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका महिलेचा अश्लील व्हिडिओ शूट करून तो तिच्या मुलाला पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतक्यावरच न थांबता आरोपीने तो व्हिडिओ परिसरातील इतर महिलांनाही दाखवला. विधवा महिलेनं लग्नासाठी नकार दिल्यानंतर आरोपीने हे कृत्य केलं. पीडितेच्या कुटुंबाने जेव्हा या गोष्टीचा विरोध केला, तेव्हा आरोपीने महिलेसह दोघांवर हातोड्याने वार केले. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या पतीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून पीडित महिला आपल्या सुनेसोबत राहते. या काळात गंगणखुर्द येथील रहिवासी भोला रविदास यानं पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच जबरदस्ती भांगेत कुंकू भरलं. तेव्हा महिलेनं या गोष्टीला विरोध केला. महिलेनं विरोध केल्यानंतर आरोपीला संताप अनावर झाला. त्याने थेट लपून महिलेचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ शूट केला. तसेच हा व्हिडिओ पीडित महिलेच्या मुलाला पाठवला.

यानंतर महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच भोला रविदासविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संतप्त झालेल्या आरोपीने महिलेचा अश्लील व्हिडिओ कुटुंबातील सदस्यांना तसेच परिसरातील महिलांना दाखवण्यास सुरूवात केली. याला विरोध केला असता, आरोपी आणि त्याच्यासोबत असणाऱ्या काहींनी काठी आणि हातोड्याने मारहाण करण्यास सुरूवात केली.

आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच सर्व जखमींना उपविभागीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT