Shocking Crash in Karnataka Saam Tv News
देश विदेश

चालकाचं नियंत्रण सुटलं, दोन बसच्या मधोमध रिक्षाचा चक्काचूर, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद; पाहा VIDEO

Shocking Crash in Karnataka: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात दोन बसमध्ये ऑटो चिरडला गेला. सुदैवाने, ऑटोमधील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले पण बचावले. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली आणि रूग्णालयात दाखल केलं.

Bhagyashree Kamble

  • कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात दोन बसमध्ये ऑटो चिरडला गेला.

  • सुदैवाने, ऑटोमधील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले पण बचावले.

  • स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली आणि रूग्णालयात दाखल केलं.

  • पोलिसांनी दोन्ही बस ताब्यात घेत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायत अपघात घडला. दोन हायस्पीड बसच्या मधोमध एक ऑटो पुर्णपणे चिरडली गेली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑटोमधील चालकासह, प्रवासी बचावले आहेत. त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. स्थानिकांनी तातडीने धाव घेत ऑटोमधील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना रूग्णालयात पुढील उपचारासाठी हलवले. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका गावात घडला. या थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर गर्दी दिसत आहे. बस, ऑटो आणि लोकांची वर्दळ दिसत आहे. भरधाव बस आधी जात आहे. बसच्या मागून एक ऑटो जात आहे. दरम्यान, ऑटोच्या मागून एक भरधाव बस जाताना दिसत आहे. भरधाव बस इतक्या वेगात येते की ऑटो पूर्णपणे चिरडला जातो.

बसच्या मधोमध ऑटो चिरडला गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ऑटोमधील जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांच्या मदतीनं सर्व जखमींना तातडीनं जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.

ऑटोचा चुराडा झाला असून, सुदैवाने ऑटोमधील प्रवाशी सुखरूप आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच दोन्ही बस ताब्यात घेतल्या. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT