Karnataka Mangalore News Saam Tv
देश विदेश

Shocking News : लखपती भिकारी महिलेची भुवया उंचावणारी श्रीमंती! कचऱ्यात सापडले लाखो रुपये

Karnataka Mangalore News : मंगळूरमध्ये मानसिक आजारी असलेल्या भिकारी महिलेच्या पिशवीत सापडले लाखो रुपये. घराबाहेर बसून ही महिला भीक मागायची. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Alisha Khedekar

कर्नाटकातील मंगळूरमध्ये लखपती भिकारी

महिला मानसिकदृष्ट्या आजारी असून घराबाहेर राहायची

भीक मागवून कमावले लाखो रुपये

शेजारच्या नागरिकांनी केला भांडाफोड

देशात गरिबीच्या परिस्थितीत असलेले कुटुंब पोट भरण्यासाठी भीक मागून खातात. त्यातील काही भिकारी हे एखादा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आल्यासारखच भीक मागून आपलं पोट भरतात. मात्र पैसे ही एक अशी गोष्ट आहे की ती एखाद्या गरिबाला श्रीमंत करू शकते तर, श्रीमंताला गरिबीच्या दारात उभी करू शकते. अशीच एक घटना कर्नाटकातील मंगळूर येथे उघडकीस आली आहे. मंगळूरमध्ये एका मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या भीक मागणाऱ्या महिलेकडे लाखो रुपये सापडले. हे पैसे एवढे होते की पैसे मोजून मोजणाऱ्यांचे हातही थकले.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील मंगळूरमध्ये राहणारी एक महिला मानसिकदृष्ट्या गेले कित्येक दिवस आजारी आहे. ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने ती नेहमी घराच्या बाहेरच्या साईडला बसून राहत होती. आणि येणाऱ्याजाणाऱ्यांकडे भीक मागत होती. भीक मागवून पैसे साठवण जणू काही तिचा छंद झाला होता. शुक्रवारी जेव्हा लोकांनी तिला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने कचऱ्याच्या डबक्याजवळ ठेवलेल्या काही पिशव्या लपवण्यास सुरुवात केली.

नागरिकांना तिच्यावर संशय आल्याने त्यांनी अधिक तपास केल्यानंतर त्यांना लाखो रुपये कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दिसले. ती महिला त्या पैशांना एखाद्या खजिन्यासारखी हाताळत होती. उपस्थित नागरिकांनी ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तडक घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान पोलिसांनी याबाबत पोलीस तपास सुरु केला आहे. शिवाय महिलेकडे सापडलेले लाखो रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. लखपती महिलेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मुंबईत देखील अशाच प्रकारे ७ कोटींची मालमत्ता असलेला भिकारी चांगलाच चर्चेत होता. त्याच्याकडे असलेली संपत्ती एखाद्या व्यावसायिकाला लाजवणारी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Hike : पेट्रोल डिझेलनंतर CNG महागला; जाणून घ्या आजचे ताजे दर

Maharashtra School: आठवड्यातून फक्त 3 दिवसच भरणार शाळा? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? वाचा काय आहे नवा प्रस्ताव

Maharashtra News Live Update: नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ होरपळला , ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर

Historic Fort : १०व्या शतकातील वैभव; डोंगरमाथ्यावर लपलाय 'हा' किल्ला, इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण

शिंदेसेनेच्या नगरसेवकाला बेदम मारहाण; लोखंडी रॉडने दोघांनी केला हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT