Delhi Crime  Saam Tv
देश विदेश

Shocking: कॅब चालकाचे अश्लील कृत्य, धावत्या कारमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन; नंतर...

Delhi Crime: दिल्लीमध्ये कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर घटना घडली. धावत्या कॅबमध्ये चालकान या विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन केले. त्याचसोबत तिच्यासमोर अश्लील कृत्य देखील केली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कॅब चालकाला अटक केली.

Priya More

कॉलेजच्या विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन केल्याप्रकरणी एका कॅब चालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांनी मॉरिसनगरमधून आरोपी कॅब चालक शंकरला बेड्या ठोकल्या. या कॅब चालकावर धावत्या कारमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर शंकरविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कॅब चालकाला अटक करत त्याची कॅब देखील जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय विद्यार्थिनी मूळची बंगळुरूची आहे. ही विद्यार्थिनी काश्मिरी गेट येथील आंबेडकर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ती दोन महिन्यांपूर्वी मॉडेल टाऊन परिसरात भाड्याच्या घरात राहायला आली होती. सोमवारी तिला विद्यापीठात जायचे होते. तिला खूप उशीर झाला होता त्यामुळे तिने अ‍ॅपवरून कॅब बुक केली. बुकिंगदरम्यान वेटिंग टाइम १० मिनिटे दिसत होता. कॅब चालक शंकरने तिला फोन करून कॅब बुकिंग रद्द करू नये अशी विनंती केली. त्यामुळे ही विद्यार्थिनी कॅबची वाट पाहत राहिली. कॅबमध्ये बसेपर्यंत चालक विद्यार्थिनीसोबत सामान्य वर्तन करत होता.

कॅब आल्यानंतर चालकाने या विद्यार्थिनीला पुढच्या सीटवर बसण्यास सांगितले. विद्यार्थिनीने त्याला नकार दिला आणि मागच्या सीटवर जाऊन बसली. विद्यार्थिनीने सांगितले की, संभाषणादरम्यान चालकाला कळाले की मी दक्षिण भारतातील आहे. त्यानंतर तो अश्लील कृत्य करू लागला. कॅब चालकाने मला वारंवार स्पर्श करण्याचा प्रयत्न करत अश्लील कमेंट्स करत राहिला. त्यानंतर त्याने कॅबमध्येच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली त्यामुळे मी प्रचंड घाबरले.'

कॅब चालकाचे अश्लील कृत्य पाहून घाबरलेली विद्यार्थिनी जोरजोरात ओरडू लागली. तरी देखील आरोपी कॅब चालकाने गाडी थांबवली नाही. काही अंतर पुढे गेल्यानंतर आरोपी कॅब चालकाने डीयू नॉर्थ कॅम्पसमध्ये कॅब थांबवली. घाबरलेली विद्यार्थिनी कशी तरी कॅबमधून बाहेर पडली आणि तिथून पळत गेली. काही अंतर पुढे गेल्यानंतर पीडितीने आपल्या मित्रांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मॉरिस नगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी कॅब चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपी ४८ वर्षांचा असून तो मलकागंजचा रहिवासी आहे. मॉरिस नगर पोलिसांनी कॅब ताब्यात घेतली आणि फॉरेन्सिक आणि क्राइम टीमकडून त्याची तपासणी करून पुरावे गोळा केले. पीडितेचे समुपदेशनही केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या शृंगार वाडीत सभेचे आयोजन सभेची जोरदार तयारी

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

PM Kisan Yojana: 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता, कारण काय? वाचा

Vice President Election: उपराष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी India आघाडीची नाही, तर BJPची मतं फुटली; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT