Uttar pradesh Shocking  Saam tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! खेळताना छतावरून कोसळला; लोखंडी सळई थेट पोटातून आरपार, ५ वर्षीय मुलाची प्रकृती नाजूक

Uttar pradesh Shocking :५ वर्षांचा मुलगा खेळताना छतावरून कोसळल्याची घटना घडली. लोखंडी सळई थेट त्याच्या पोटातून घुसली.

Vishal Gangurde

५ वर्षीय मुलगा छतावरून खाली कोसळला

लोखंडी सळईने मुलाच्या पोटातून आरपार घुसली

ग्राइंडर मशीनच्या सहाय्याने त्याला बाहेर काढलं

५ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात रविवारी धक्कादायक घटना घडली. उत्तर प्रदेशच्या खखरेरू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामनगरमध्ये ५ वर्षीय मुलगा खेळता खेळता छतावरून कोसळला. त्यानंतर एका निर्माणाधीन घराची लोखंडी सळई त्याच्या पोटातून आरपार घुसली. या धक्कादायक दृश्य पाहून कुटुंब आणि परिसरातील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली .

नेमकं काय घडलं?

५ वर्षांचा लहान मुलगा मावशीच्या लग्नासाठी आला होता. घरातील कुटुंबीय लग्नकार्यात व्यग्र होते. कुटुंबीय व्यग्र असताना ५ वर्षीय लहान मुलगा छतावर खेळायला गेला. त्यानंतर खेळता खेळता मुलगा छतारून कोसळला.त्यानंतर बाजूला एका निर्माणाधीन घराची लोखंडी सळई मुलाच्या पोटात आरपार घुसली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले.

मुलाच्या पोटात घुसलेली सळई काढण्यासाठी ग्राइंडर मशीन मागवावी लागली. मोठ्या मेहतनीने मुलाला बाहेर काढलं. त्यानंतर सळई अडकेल्या स्थितीत मुलाला जवळील रुग्णालयातून दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्याला कानपूर येथील हॅलेट रुग्णालयात पाठवलं.

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, दुर्घटना घडल्यानंतर उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. मुलाच्या शरीरात आरपार सळई घुसली होती. रुग्णालयात दाखल केलेल्या मुलाची मृत्यूशी झुंज सुरु आहे. ५ वर्षीय मुलाचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईक आणि स्थानिकांनी ईश्वराला प्रार्थना सुरु केली आहे.

उत्तर प्रदेशात नेमकी कुठे घडली घटना?

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील रामनगर ही घटना घडली.

अपघात नेमका कसा घडला?

मुलगा छतावर खेळताना खाली कोसळला. त्यानंतर निर्माणाधीन घरातील लोखंडी सळई त्याच्या पोटात आरपार घुसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Politics : बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; पण आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता? नेमकं काय घडलं?

उमेदवारीवरून मातोश्रीबाहेर महिलांचा गराडा; हालीम शेख यांच्या उमेदवारीला विरोध|VIDEO

Case No. 73: मुखवट्यामागचं गूढ उलगडणार! थरारक रहस्यकथेने सज्ज 'केस नं. ७३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Tuesday Horoscope: तब्येतीकडे लक्ष द्या, 5 राशींचं भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर; पहिल्या यादीत फक्त ७ नावे

SCROLL FOR NEXT