Sunday Horoscope : तुम्हाला खोकला, दमा, फुफ्फुस निगडित आजार आहेत? सावध व्हा! ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

Sunday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तर काहीजण स्वमग्न पाहायला मिळतील.
horoscope in marathi
Horoscope In MarathiSaam tv
Published On

पंचांग

रविवार,२६ ऑक्टोबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष,कड पंचमी,पांडव पंचमी.

तिथी-पंचमी ३०|०५

नक्षत्र-ज्येष्ठा

रास-वृश्चिक १०|४७ नं. धनु

योग-शोभन

करण-बवकरण

दिनविशेष-११ नं. चांगला

horoscope in marathi
Home Vastu: घरात देवघर करताना 'या' चुका टाळा, अन्यथा घरात येऊ शकेल संकट

मेष - काहीतरी गोड गोष्टींची विशेष आवड आज आपल्याला वाटेल. रहस्यमय कथा, मूव्हि यामध्ये मन रमेल. एक वेगळे काहीतरी वलय घेऊन आज वावराल. वाहनांपासून मात्र सावधगिरीचा इशारा आहे.

वृषभ - कलासक्त असणारी आपली रास. जोडीदाराबरोबर मनमुरादपणे सुखाची उधळण कराल. त्याचबरोबर व्यावसायिक गोष्टींमध्ये चांगल्या प्रकारे वाटचाल होईल. महत्त्वाच्या बैठका पार पडतील.

मिथुन - खोकला, दमा, फुफ्फुस निगडित आजार असतील तर आज विशेष काळजी घ्यावी लागेल. आजोळी प्रेम वाटेल. मामाकडून काहीतरी प्रेयस मिळण्याचे योग आहेत. दिवस संमिश्र आहे.

horoscope in marathi
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार पूजेचं साहित्य कोणत्या दिशेला ठेवावे?

कर्क - उपासनेने आयुष्याची नवीन दिशा मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. पैशाची निगडित व्यवहार आज करायला हरकत नाही. मन कोमल आणि सुस्त राहील. प्रेम प्रकरणांमध्ये मात्र यश आहे .

सिंह - घरामध्ये लीडरशिप घेऊन वागावे लागेल. इतरांना सांभाळून घेता घेता पुरे वाट होईल. पण अर्थात या गोष्टी तुमच्या राशीला लिहिल्या झेलता येतात. मोठे व्यवहार होतील. दिवस सुखकारक आहे.

कन्या - जवळच्या प्रवासा मधून फायदा दिसतो आहे. भावंड सौख्य उत्तम आहे. वक्ते, प्रकाशक, लेखक यांना दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. मुळात बुद्धिमान असणारी आपली रास आज बुध उत्तम साथ देईल.

तूळ- आपल्या राशीला विशेषत्वाने पैशाचे महत्त्व आहे. आज याच्याशी निगडित आहे महत्त्वाचे व्यवहार होतील. प्रॉपर्टीच्या अनेक गोष्टी आज फायदेशीर ठरतील. मनाने ठरवलेले आयोजन नियोजन त्याच पद्धतीने घडून येईल.

वृश्चिक - आपल्यावर प्रेम करणे हीच इतरांवर प्रेम करण्याची सुरुवात आहे हे जाणवेल. स्वमग्न राहाल. कदाचित अबोला असणे आज स्वीकाराल .पण आनंदाचे अनुभूती घेत दिवस व्यस्त राहील.

धनु - एखादा निर्णय घ्यायला आपल्या राशीला दोनदा विचार करावा लागतो. कधी महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी मन कचरते. आजही अशीच अवस्था होईल. मनोबल कमी राहील आणि म्हणूनच जवळच्या व्यक्तीचा आधार आज भक्कम वाटेल. खर्च वाढतील.

horoscope in marathi
Diwali Lighting Vastu Tips: दिवाळीत लायटिंग लावताय? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा

मकर - जुने परिचय ओळखी यामधून प्रगती दिसून येते आहे. जितके श्रम कराल तितका फायदा आहे. नवनवीन कल्पनांनी व्यापलेला दिवस असेल. धनयोग येतील.

कुंभ - कर्म प्रधानतेचा कारकग्रह शनी आहे. आणि आपली रास शनीचीच आहे. कोणतेही काम चोखपणे करायला आपल्याला आवडते. काही वेळेला आळस अडवा येतो पण आज हे झटकून पुढे चालत जाल.यश तुमचेच आहे हे ध्यानात ठेवा.

मीन - देवाची सोबत आपल्याला आवडते. एक वेगळ्या आत्मीयतेने आपण भगवंताचे आराधन करत असता. आज सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर जाल तर भाग्यकारक घटना घडणार आहेत. यश हुलकावणी न देता तुमचे स्वागत करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com