झारखंडमध्ये 4 मित्र धरणात बुडून मृत्यूमुखी
या तरुणाने पोहण्यासाठी धरणात उडी मारली
डोकं दगडावर आपटून या तरुणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे
चौघेही जिवलग मित्र होते. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली
झारखंडमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. पोहण्यासाठी धरणावर गेलेल्या ४ जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोहण्यासाठी त्यांनी धरणांत उडी मारली पण ते परत बाहेर आलेच नाहीत. चौघांचाही या घटनेत मृत्यू झाला. ही घटना खरसावा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दलाईकाला गावात शनिवारी घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मित्र गावानजिकच्या धरणामध्ये अंघोळीसाठी गेले होते. यामधील दोन तरुण धरणाच्या कडेला उभे होते. तर ४ तरुणांनी धरणामध्ये पोहण्यासाठी उडी मारली. पण ते परत बाहेर आलेच नाही. या तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. या चारही तरुणांनी धरणात उडी मारल्यानंतर धरणाच्या तळाशी असलेल्या दगडांवर त्यांचे डोक आपटले असावे त्यानंतर या तरुणांना पाण्यातून बाहेर पडता न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मृत्यू झालेले चारही तरुण खूप चांगले मित्र होते. त्यांच्या मृत्यूची बातमी दलाईकाला गावात पसरली. त्यानंतर गावकऱ्यांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर खरसावन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी धरणातून चारही मृत तरुणांचे मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे दलाईकाला गावावर शोककळा पसरली.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांची नावं गौरव मंडल, सुनील साहू, मनोज साहू आणि हरिवास दास अशी होती. चौघेही एकाच गावात राहणारे होते. मृत चारही मुलांचे वय १८ ते २१ वर्षांदरम्यान होते. या हृदयद्रावक घटनेपूर्वी १५ एप्रिल २०२५ रोजी झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील उदसुगी गावात एका लहान तलावात आंघोळ करताना बुडून चार मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेने देखील गावात शोककळा पसरली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.