Goa Elections 2022
Goa Elections 2022 Saam Tv
देश विदेश

Goa Elections 2022: गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार; पहिली उमेदवार यादी जाहीर

वृत्तसंस्था

पणजी - गोव्यात आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्ष आता आप आपल्या उमदेवारांची यादी जाहीर करत आहेत. काल (२० जानेवारी) भाजपने आपली यादी जाहीर केल्यानंतर आज (२१ जानेवारी) शिवसेनाने (Shivsena)देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत आज गोव्यात शिवसेनेने पत्रकार परिषद घेत उमेदवारांची यादी जाहीर केली. (Goa Shivsena Candidate List)

हे देखील पहा -

तसेच गोव्यात भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाविकास आघाडी करण्याचा शिवसेनेचा काँग्रेसला प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र ते होऊ शकले नाही. असे असले तरी शिवसेनेने अखेर गोव्यात राष्ट्रवादीचा हात धरला आहे. गोव्यात शिवसेना 10 ते 12 जागा लढणार असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच गोव्याच्या निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेचे बडे नेते प्रचारासाठी उतरण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या 9 उमेदवारांची यादी घोषित

पेडणे - सुभाष केरकर

म्हापसा - जितेश कामत

शिवोली - विल्सेट परेरा

हळदोणे - गोविंद गोवेकर

पणजी - शैलेश वेलिंगकर

पर्य़े - गुरुदास गावकर

वास्को - मारुती शिरगावकर

केपे - अ‍ॅलेक्स फर्नांडिस

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT