sanjay raut  saam tv
देश विदेश

कॉमेडी एक्सप्रेस सिझन १ मुंबईत झाला, दुसरा दिल्लीत सुरू; राऊतांचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल

फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय कोर्टात लागेल. आम्हाला खात्री आहे की, शिवसेनेने १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका कोर्टात दाखल केली, ती याचिका पक्की आहे. आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : खासदार गजानन किर्तीकर , खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे आदी. सर्व खासदार शिवसेनेत आहेत. जे काही वृत्त दाखवण्यात आलं, ते कॉमेडी एक्सप्रेस सिझन २ आहे. कॉमेडी एक्सप्रेस सिझन १ विधीमंडळात झाला. त्याचा लवकर निकाल सुप्रीम कोर्टात लागणार आहे. लवकरच फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय कोर्टात लागेल. आम्हाला खात्री आहे की, शिवसेनेने १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका कोर्टात दाखल केली, ती याचिका पक्की आहे. आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. ( Sanjay Raut News In Marathi )

खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊत पुढे म्हणाले, फुटीर गट शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो, तो फुटीर गट आहे. फुटीर गटाला पक्ष मान्यता देखील नाही. हा गट बाळासाहेबांच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतो, त्यानंतर दुसरी कार्यकारिणी जाहीर करतो. त्यामुळे हा कॉमेडी एक्सप्रेस सिझन २ आहे. लोक हसत आहेत, मजा घेत आहे.

स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी सोडून गेलेल्यांची धडपड सुरू आहे. सोडून गेले तरी शिवसेना भक्कमपणे उभी आहे. शिवसेनेचं नेतेमंडळ हे बाळासाहेबांनी निर्माण केलं आहे. शिवसेना हा नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. शिवसेना गट नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. कोणत्याही गटाला कार्यकारिणी स्थापन करण्याचा अधिकार नाही. त्याचा परिणाम शिवसेनेवर होणार नाही'.

'शिंदे गटाच्या दाव्याला उत्तर द्यायला आम्ही बसलेलो नाही. आम्ही शिवसेनेची भूमिका मांडत आहोत. सध्या संभ्रम निर्माण केला जात आहे. लोकसभेत आम्ही खासदार राजन विचारे यांची मुख्यप्रतोदपदी केलेली नेमणूक कायद्याच्या आधारावर केली आहे. तेच मुख्यप्रतोद आहे. आम्ही १६ नावं अपात्रतेसाठी दिली आहेत, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं देखील नाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत खुर्ची वाचवण्यासाठी येतील.

शिवसेनेला खात्री आहे की, देशातला न्याय अद्याप मेलेला नाही. सुप्रीम कोर्टात न्याय होईल. शिंदे गटाने १४ खासदार बंडखोरी करणार असल्याचा दावा हा केवळ लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे ही फसवाफसवी आहे. कॉमेडी एक्सप्रेस सिझन १ मुंबईत झाला, दुसरा दिल्लीत सुरू आहे. बाळासाहेबांची शिवसेना मातोश्रीतून चालेल. फुटीर गटाने तुम्ही वेगळा संसार थाटा, आमचं काहीच म्हणणं नाही., असंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

Mithila Palkar: गोड गोजिरी, लाज लाजिरी.... अभिनेत्रीच्या सौंदर्याने केलं घायाळ

SCROLL FOR NEXT