मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाची शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

शिवसेनेचे खंंदे समर्थक आता एकनाथ शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे.
uddhav Thackeray And eknath Shinde
uddhav Thackeray And eknath Shindesaam tv
Published On

मुंबई : महाराष्ट्रात डरकाळी फोडणाऱ्या शिवसेना पक्षाची गेल्या काही दिवसांपासून राजकीय कोंडी झाली आहे. मागील जवळपास चाळीस वर्षांपासून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतलेले राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या राजकारणात वादळ आणलं. शिवसेना पक्षात बंड केलं नाही, तर हा आमचा उठाव आहे, असे सांगतानाच शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या भात्यातील बाण काढायला सुरुवात केलीय. म्हणजेच शिवसेनेचे खंदे समर्थक आता एकनाथ शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. आमची शिवसेना (shivsena) खरी, असा कांगावा राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु आहे. आता कोणाची शिवसेना खरी आहे ? हे कोर्टाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे गटाने (National Working Committee) नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे.

uddhav Thackeray And eknath Shinde
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! आजी-माजी आमदार 'पिता-पुत्र' एकनाथ शिंदे गटात सामील ?

'अशी' आहे एकनाथ शिंदे गटाची शिवसेनेची कार्यकारिणी

एकनाथ शिंदे गटाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून महत्वाच्या पदांवर ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी दीपक केसरकर यांची नियुक्ती केली आहे.

uddhav Thackeray And eknath Shinde
MP Bus Accident : बस अपघातानंतर बचावकार्य सुरू; फडणवीसांनी मानले CM शिवराजसिंह यांचे आभार

शिवसेनेच्या नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची वर्णी लागली आहे. तसेच उपनेतेपदाची जबाबदारी यशवंत जाधव,गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे,तानाजी सावंत,विजय नहाटा,शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुखपदाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

राज्याच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांना मोठा हादरा दिला. शिंदे गटाने भाजपच्या सहकार्याने राज्यात सत्तांतर केलं आणि राज्याच्या राजकारणाला नवीन कलाटणी लागली. त्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्टिव्ह मोडमध्ये असल्याचे चित्र राजकीय मैदानात निर्माण झाले आहे. कारण, मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, पालघर, रत्तागिरी, बदलापूर, लातूर अशा विविध जिल्ह्यातील आजी-माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com