Shivraj Singh Chouhan Resigned Saam Tv
देश विदेश

Shivraj Singh Chouhan Resigned : मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग, शिवराज सिंह चौहान यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Shivraj Singh Chouhan: मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग, शिवराज सिंह चौहान यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Satish Kengar

Shivraj Singh Chouhan his resignation to Governor Mangubhai C. Patel :

मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

मोहन यादव यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी तात्काळ राज्यपाल मंगुभाई पटेल यांची भेट घेतली. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांची निवड निश्चित झाल्यानंतर त्यांच्या बहिणीने एएनआयशी बोलताना आनंद व्यक्त केला आहे. भगवान महाकाल यांचा आशीर्वाद आहे. पक्षाचा आशीर्वाद आहे. १९८४ पासून ते भाजपमध्ये काम करत आहेत. ज्यावेळी ते उज्जैनमध्ये येतील त्यावेळी महाकालचं दर्शन घेतील, असे त्यांच्या बहिणीने सांगितले.  (Latest Marathi News)

मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी अभिनंदनाचं ट्वीट केलं आहे. यात ते म्हणाले आहेत की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ते मध्य प्रदेशला प्रगती आणि विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील आणि क्षेत्रात नवे विक्रम निर्माण करतील, असा मला विश्वास आहे. या नवीन जबाबदारीसाठी खूप खूप अभिनंदन. सोमवारी (11 डिसेंबर) भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.''

दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपने मोठा विजय मिळवला तेव्हा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत जोरदार चर्चा सुरू हल्या होत्या. शिवराज सिंह चौहान ते प्रल्हाद पटेल अशी नावे समोर येऊ लागली होती. हे दोन्ही नेते ओबीसी समाजातील आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी 15 वर्षे सरकार चालवले आहे. त्यामुळे त्यांचे नाव अग्रस्थानी होते. मात्र पुन्हा एकदा भाजप पक्षाने सर्वांना धक्का देत एका नवीन नावाची घोषणा करत मोहन यादव यांना मुख्यमंत्री केलं आहे.

यातच आता आणखी एक प्रश्न उभा राहिला आहे, तो म्हणजे शिवराज सिंह चौहान यांना आता पक्ष कोणती नवीन जबाबदारी देणार? त्यांना केंद्रात मंत्री केलं जाईल की दुसरं काही? हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT