मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्याची नावाची घोषणा होताच मोहन यादव कोण आहेत. हा प्रश्न विचारला जात असून इंटरनेटवर त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या शिक्षणाचा शोध घेतला जात आहे. मोहन यादव यांनी चक्क दोन पदव्या घेतल्या आहेत. मोहन यादव यांनी बीएससी, एलएलबी आणि पीएचडीची पदवीचं शिक्षण घेतलंय. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये डॉक्टर मोहन यादव यांनी उज्जैन दक्षिणच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघात त्यांनी ९५, ६९९ मते घेत विजय मिळवला. यादव यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रेमनारायण यादव यांना १२,९४१ मतांनी पराभूत केलं. (Latest News)
श्रीमंत नेत्यांमध्ये होतो समावेश
माय नेता डॉट कॉमनुसार,मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे ४२ कोटी रुपयांचे संपत्ती आहेत. तर त्यांच्यावर ९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. दरम्यान राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीआधी नेत्यांनी आपल्या संपत्तीविषयीची माहिती उमेदवारी अर्ज भरताना दिली होती. यात एमपीचे टॉप तीन मंत्र्यांमध्ये भूपेंद्र सिंह आणि दुसऱ्या नंबरवर मोहन यादव यांचे नाव आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
किती आहे संपत्ती
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीच्या आयोगात दिलेल्या माहितीनुसार, मोहन यादव यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिलीय. मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ४२,०४,८१,७६३ आहे. यात मोहन यादव यांच्याकडे १.४१ लाख रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नी सीमा यादव यांच्याकडे रोख ३.३८ लाख रूपये आहे. वेगवेगळ्या बँकेत त्यांच्या आणि त्यांची पत्नीच्या बँक खात्यात २८,६८,०४४.९७ रुपये जमा आहेत.
मोहन यादव यांनी पैशांची मोठी गुंतवणूक केलीय. यादव यांनी आणि त्यांच्या पत्नीने अनेक कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर आणि बॉन्ड्समध्ये ६,४२,७१,३१७ रुपयांची गुंतवणूक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन यादव यांच्या नावावर बजाज अलायन्समध्ये साधरण ३ लाख रुपयांची पॉलिसी आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर रिलायन्स निपॉन, बजाज अलायन्समध्ये ९ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा विमा पॉलिसी घेतल्या आहेत.
निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरताना मोहन यादव यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी शेत जमीन असल्याचं देखील सांगितलं. त्यांच्याकडे १५ कोटी रुपयांची शेत जमीन आहे. मोहन यादव यांच्या नावावर एक प्लॉट असून त्याची किमत १ कोटी रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ६ कोटी रुपये किमतीच्या प्लॉट आहेत. तर ६ कोटी रुपयांचा प्लॅट आणि घरसुद्धा त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत.
आठ लाख रुपयाचे सोनं आणि कार आणि शस्त्र
मोहन यादव यांच्याकडे १४० ग्राम सोने असून बाजारात त्याची किमत ८ लाख रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे २५० ग्राम सोने इतर दागिने आहेत. तसेच १.२ किलोग्रॅम चांदी आहे. याची किमत १५.७८ लाख रुपये आहेत. तसेच मोहन यादव यांच्याकडे २२ लाख रुपये किमतीची एक इनोव्हा कार आहे. ७२ हजार रुपयांची सुझुकी कंपनीची स्कूटर आहे. तर त्यांच्याकडे ८० हजार रुपयांची एक बंदूक, ८ हजार किंमतीची बोर बंदूक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.