Election Commission PC : बिगुल वाजला... मध्य प्रदेश, राजस्थानसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित, कुठे आणि कधी मतदान?

Election Commission Announce 5 States Poll : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत.
Election Commission PC
Election Commission PCSaam TV

Election Commission Announce 5 States Poll :

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांची घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जारी केला आहे.

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबरला पहिला टप्प्यात तर दुसऱ्या टप्प्यात १७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल.

मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल. तर ३ डिसेंबरला सर्व राज्यातील मतमोजणी पार पडेल. (Latest News)

Election Commission PC
Raj Thackeray On Toll: ...तर हे सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, काय करायचं ते करा; राज ठाकरे आक्रमक

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत एकूण १६.१४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष आणि ७.८ कोटी महिला मतदार असतील. यावेळी ६०.२ लाख नवीन मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. (Political News)

कोणत्या राज्यात किती मतदार आहेत?

  • मध्य प्रदेश - ५.६ कोटी

  • राजस्थान - ५.२५ कोटी

  • तेलंगणा - ३.१७ कोटी

  • छत्तीसगड - २.०३ कोटी

  • मिझोराम - ८.५२ लाख

Election Commission PC
Israel-Palestine Tension : इस्राइल-हमास संघर्षात १०००हून अधिक बळी; कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ

पाच राज्यांमध्ये एकूण १.७७ लाख मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. १.०१ लाख मतदान केंद्रांमध्ये वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

राज्यनिहाय मतदान केंद्र

  • मध्यप्रदेश - ६४,५२३ मतदान केंद्र

  • राजस्थान - ५१,७५६ मतदान केंद्र

  • छत्तीसगड- २४,१०९ मतदान केंद्र

  • तेलंगणा - ३५,३५६ मतदान केंद्र

  • मिझोरम - १२७२ मतदान केंद्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com