Shrikant Shinde proposal  Saam tv
देश विदेश

निवडणूक लढवण्याचं किमान वय २५ वरून १८ किंवा २१ होणार? सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा केंद्र सरकारला प्रस्ताव

parliament winter session 2025 : निवडणूक लढवण्याचं किमान वय २५ वरून १८ किंवा २१ करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. शिंदे यांनी थेट केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे.

Vishal Gangurde

खासदार शिंदेंनी निवडणूक लढवण्याचं वय २५ वरून १८ किंवा २१ करण्याचा प्रस्ताव मांडलाय

लोकसभेत निवडणूक सुधारणा चर्चेदरम्यान खासदार शिंदेंनी ही मागणी केली

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ आणि ‘एकल मतदार यादी’ची मागणी खासदार शिंदेंन केली

संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम', 'एसआयआर'चा मुद्दा गाजत आहे. त्याचवेळी शिवसेनेने केंद्र सरकारकडे निवडणूक लढवण्याचं किमान वय २५ वरून १८ किंवा २१ वर्षे करावं, अशी मागणी केली आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही मागणी केली आहे.

लोकसभेत निवडणुकीत सुधारणा करण्याविषयी चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षातील खासदारांकडूनही अनेक सुधारणा सुचवल्या जात आहेत. याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढवण्यासाठी किमान वय थेट २१ किंवा १८ करण्याची सुधारणा सुचवली आहे. त्यांनी सर्व निवडणुकींसाठी 'एक राष्ट्र, एक निवडणूक' , 'एकल मतदार यादी' असावी, जेणेकरून मतदान केंद्रापासून दूर बसलेल्या लोकांनाही मतदान करण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना देखील सुचवली.

शिंदे यांनी यावेळी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेख करत शिंदेंनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'ज्या पक्षाच्या प्रमुखांनी सत्तेसाठी संविधानाचा गळा दाबला, त्या पक्षाचे लोक आता संविधान घेऊन फिरत आहेत, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर टीकेचा बाण डागला.

काँग्रेसवर टीका करताना शिंदेंनी पुढे म्हटलं की, 'काँग्रेसच्या कार्यकाळात मतदान पेट्यांवर अॅसिड टाकून मतपत्रिका जाळल्या जायच्या. काही राजकीय पक्षांचा मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला देखील विरोध आहे. कारण त्यांना व्होट बँकेचं राजकारण करायचं आहे'.

शिंदे यांनी पुढे सांगितलं की, 'त्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर ६ वर्ष मतदान करण्यावर बंदी घातली होती. त्याच काँग्रेससोबत ठाकरेंच्या खासदारांची हातमिळवणी झाली आहे. या राजकीय पक्षांना घुसखोरांना मतदार यादीतून बाहेर काढण्यात अडचण आहे, काण त्यांना व्होट बँकेचे राजकारण खेळायचं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

Wednesday Horoscope : सर्व लाभ पदरात पडतील; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

दारू पिण्यासाठी बायकोची परवानगी न घेतल्यास नवऱ्याला जेल? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT