Agra Shiv Jayanti 2025 Saam Tv
देश विदेश

Shiv Jayanti 2025: आग्र्यातील ऐतिहासिक किल्ल्यावर दणक्यात साजरी होणार शिवजयंती; 'छावा'मधील विकी कौशलही उपस्थित राहणार

Agra Shiv Jayanti 2025: आग्र्यातील ऐतिहासिक किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल प्रमुख उपस्थिती लावणार आहे.

Priya More

राज्यासह देशभरामध्ये शिवजयंतीची तयारी मोठ्या उत्साहामध्ये केली जात आहे. येत्या १९ फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी शिवजयंती आहे. आग्र्यातील ऐतिहासिक किल्ल्यावर सलग तिसऱ्या वर्षी दणक्यात शिवजयंती साजरी होणार आहे. हा शिवजयंतीचा उत्साह यंदा खूपच खास असणार आहे यामागचे कारण म्हणजे छावा फेम अभिनेता विकी कौशल या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणार आहे.

आग्र्यातील ऐतिहासिक किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आग्रा, उत्तर प्रदेश – संपूर्ण राष्ट्राचा गौरव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सलग तिसऱ्या वर्षी आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्यात थाटामाटात साजरी होणार आहे. ही घोषणा अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान तळपलेल्या आणि महाराष्ट्राची अस्मिता जागवणाऱ्या आग्रा किल्ल्यात हा भव्य सोहळा अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते विकी कौशल उपस्थित राहणार आहे. या शिवजयंती सोहळ्यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंती सोहळ्याची वैशिष्ट्य -

- छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम

- सुप्रसिद्ध गायक नितीन सरकटे व उत्कर्ष शिंदे यांचे गायन.

- शिव जन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताचे सादरीकरण

- ‘अफझल खान वध’ प्रसंगाचे नाट्यरूपांतर

- कोल्हापूरच्या सब्यसाची गुरुकुलकडून पारंपरिक मर्दानी खेळाचे सादरीकरण

- शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित दीपोत्सव व डिजिटल आतषबाजी

कार्यक्रमाचा वेळ आणि स्वरूप -

- संध्याकाळी ६:०० वाजता सुरुवात – शिवरायांवरील गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात

- दीपप्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत

- शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि नाट्यरूपांतर

- शिव जन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताचे सादरीकरण

- मर्दानी खेळाचे थरारक सादरीकरण

- विविध मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

- कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने

ऑनलाइन कुठे पाहता येणार कार्यक्रम?

या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी जगभरातील शिवप्रेमी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि YouTube या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लाईव्ह सहभागी होतील. विविध वृत्तवाहिन्यांवरूनही या शिवजयंती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही घर बसल्या या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT