
अक्षय गवळी,साम टीव्ही
अकोला : राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जय्यत तयारी सुरु झाली अहे. अकोल्यातही शिवभक्तांनी जन्मोत्सवाची तयारी सुरु केली आहे. अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी 18,000 स्क्वेअर फुटात गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून साकारली महाराजांची प्रतिमा साकारली आहे. डोळ्याला पारणे फेडणारे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
अकोल्यातल्या २५ विद्यार्थ्यांनी पंधरा दिवसाच्या अवधीमध्ये ही प्रतिमा साकारली आहे. अकोल्यातील प्रतिमा साकारण्याकरिता चार क्विंटल गहू आणि पस्तीस किलो मोहरी लागली आहे. सर्वप्रथम मैदानाची आखणी करण्यात आली आहे. त्यानंतर प्रतिमेचे रेखाटन करण्यात आले. नंतर त्यात गहू आणि मोहरी पेरण्यात आली. महाराज जणू गडावरून खाली उतरून आले, असा हा देखावा या प्रतिमेतून अंकित होत आहे.
छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारण्याकरिता महाविद्यालयाचे विद्यार्थी, चतुर्भुज आर्टचे विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. अकोल्यातील अकोट शहरातील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात साकरण्यात आली. छत्रपती शिवाजी महारांजाची प्रतिमा साकारण्यासाठी महाविद्यालयाच्या परिसरात ४ क्विंटल गहू आणि पस्तीस किलो मोहरी लागवड केली.
सुरुवातीला मैदानाची आखणी करण्यात आली. त्यानंतर प्रतिमेचे रेखाटन करण्यात आले. पुढं त्यात गहू आणि मोहरी पेरण्यात आली. महाराज जणू गडावरून खाली उतरून आले, असा हा देखावा या प्रतिमेतून अंकित होत आहे. ही प्रतिमा साकारण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि चतुर्भुज आर्टने अथक परिश्रम घेतले.
जपानची राजधानी टोकियो येथे महिला दिनाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी आम्ही पुणेकर या संस्थेकडून येत्या आठ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभा करण्यात येणार आहे.
या स्मारकासाठी आठ फुटी हे भव्यदिव्य पुतळा उद्या स्पेशल विमानाने जपान येथे पाठविण्यात येणार आहे. जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. जपानमध्ये बसविण्यात येणाऱ्या या पुतळ्याचे पूजन आज करण्यात आले, हा पुतळा घेऊन देशातील तेरा राज्यातून 8 हजार किलोमीटर प्रवास केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप देखील यावेळी करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.