Vishal Gangurde
छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ मुले होती. त्यांना दोन पुत्र आणि ६ कन्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराज आणि राजाराम महाराज असे दोन पुत्र होते. दोन्ही पुत्र पुढे मराठा साम्राज्याचे राजे बनले.
सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई, दिपाबाई, राजकुंवरबाई, कमलबाई अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकन्यांची नावे होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व राजकन्यांचा विवाह झाला. त्यांचा विवाह मराठा साम्राज्यातील पराक्रमी कुटुंबात झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांना सईबाई यांच्यापासून संभाजी महाराज यांची पुत्रपाप्ती झाली.
सोयराबाई यांच्या पोटी राजाराम महाराजांचा जन्म झाला.
सखुबाई ज्येष्ठ राजकन्या होत्या. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाडक्या होत्या.