shashi tharoor  saam tv
देश विदेश

Shashi Tharoor: जय श्री राम बोलणार नाही तर मारणार, हे हिंदूत्व नाही; हिंदूत्वावर शशी थरूर काय म्हणाले?

Shashi Tharoor on Hindutva: काँग्रेस खासदार शशी थरूर आपल्या परखड मतांसाठी ओळखले जातात. त्यांनी नुकतंच हिंदुत्वावर एक विधान केलं आहे. ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.

Bhagyashree Kamble

काँग्रेस खासदार शशी थरूर आपल्या परखड मतांसाठी ओळखले जातात. त्यांनी नुकतंच हिंदुत्वावर एक विधान केलं आहे. ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कोणाकडूनही जबरदस्तीने जय श्री राम हा नारा बोलावून घेणं म्हणजे हिंदुत्व नाही. खरा हिंदू बनण्यासाठी आपल्याकडे चार मार्ग आहेत. याच चार मार्गाबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. जयपूर लिटरेचर फेस्टमध्ये थरूर यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान, फ्रान्सेस्क मिरालेस यांच्यासोबत इंटरेक्टिव सेशनमध्ये त्यांनी हे विधान केलं होतं.

'खरा हिंदू होण्याचे चार मार्ग'

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये शशी थरूर म्हणाले, 'खरा हिंदू बनण्याचे चार मार्ग आहेत. ज्ञानयोग, ज्यामध्ये वाचन आणि ज्ञानाद्वारे तुम्ही आध्यात्मिक कल्पना समजून घेऊ शकता. भक्ती योग, ज्याचा अवलंब बहुतांश लोक करतात. त्यानंतर येतो राजयोग म्हणजेच ध्यान, आत्मचिंतन आणि स्वतःमध्ये सत्याचा शोध. शेवटी येतो कर्मयोग, जे महात्मा गांधी यांनी पाळला होता. कर्मयोगात तुम्ही मानवतेची सेवा करता, तुमच्या सहकारी स्त्री-पुरुषांची सेवा करता आणि या सेवेद्वारे तुम्ही प्रत्यक्ष देवाची पूजा करता.'

शशी थरूर म्हणतात, 'स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे की हिंदू धर्म कधीही धार्मिक हिंसाचाराची आग पेटवणार नाही. शशी थरूर यांनी ब्रिटिश फुटबॉल संघांचे उदाहरण दिले. खरं तर, एकेकाळी ब्रिटिश फुटबॉल संघांच्या समर्थकांमध्ये अशीच भावना होती. इतर संघांना आणि त्यांच्या समर्थकांना कुणी पाठिंबा दर्शवला तर, त्यांची तळपायाची आग मस्तकात जायची. त्यामुळे अनेक दंगली घडल्या'.

'यापूर्वी असायचे की जर तुम्ही माझ्या संघाला पाठिंबा दिला नाही तर मी तुमचे डोके फोडेन. सध्या हिंदू धर्मातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. जर तुम्ही जय श्री राम यांचा नारा नाही लावला तर तुम्हाला मी चाबकाने मारेन. हा आपला हिंदू धर्म नाही. याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही.' असं शशी थरूर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT