Mahayuti government conflict: महायुतीतील अंतर्गत वाद मिटणार? पालकमंत्रिपदाच्या तिढ्यावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

Sunil Tatkare: अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.'दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच मिटेल, असं वक्तव्य तटकरे यांनी केलं. तटकरे यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath ShindeSaam Tv
Published On

महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन अंतर्गत कलह सुरु आहे. या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर केल्यानंतर एका दिवसांत सरकारला नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली होती. सरकारने दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देऊन दोन आठवडे उलटले आहेत. त्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. यावरच आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.'दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच मिटेल, असं वक्तव्य तटकरे यांनी केलं. तटकरे यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

रायगड आणि नाशिक या जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून महायुतीतील नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. रायगडचे पालकमंत्रिपद अदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी मंत्री भरत गोगावले आग्रही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद समोर आला होता. या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Crime News: निर्दयी मामा! २ वर्षाच्या भाचीला विहिरीत फेकलं, कलयुगी कंस 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद आणि तिढा लवकरच सुटेल, असं सुनिल तटकरे म्हणाले आहेत. पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला अंतर्गत वाद आणि तिढ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असंही सुनिल तटकरे यांनी सांगितलं. त्यामुळे हा तिढा लवकर सुटेल की आणखी वाढेल हे येत्या काळात कळेल.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Fake insurance scam Pune: LIC पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक, पुण्यातून ३ जणांना ठोकल्या बेड्या

तसेच पालकमंत्रिपदावरून सुनिल तटकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 'दगड फक्त फळ येणार्‍या झाडालाच मारले जातात'. असं जिल्हा नियोजनाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद तटकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं. तसेच आमच्या पक्षाकडून कोणतीही टीका टिप्पणी करण्यात आलेली नाही, असंही तटकरे म्हणाले.

'त्या दोघांचे संबंध चांगले आहेत आम्ही चर्चा करू'

अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी निवडणुकीत योगेश कदम यांचं कामच केलं नाही, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता. यावर सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे रामदास कदम यांची तक्रार येईल तेव्हा माहिती घेऊ, असं तटकरे म्हणाले. तसेच त्या दोघांचे संबंध चांगले आहेत आम्ही चर्चा करू, असंही सुनिल तटकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com