योगी सरकारकडून सत्तेचा गैरवापर- शरद पवार  Saam Tv
देश विदेश

योगी सरकारकडून सत्तेचा गैरवापर- शरद पवार

लखीमपूर खेरी इथल्या घटनेबद्दल सध्या जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपली आज पत्रकार परिषदेतून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विहंग ठाकूर

विहंग ठाकूर

नवी दिल्ली - लखीमपूर खेरी इथल्या घटनेबद्दल सध्या जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपली आज पत्रकार परिषदेतून आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी या प्रकरणावरुन मोदी सरकारवर Central Government जोरदार टीका केली आहे.

हे देखील पहा-

यावेळी बोलत असताना, शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. देशातला शेतकरी संतत बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावर माझा निषेध आहे. याची चौकशी झाली पाहिजे. असे शरद पवार म्हणले.

"शेतकरी आंदोलन शांतीपूर्ण आहे. दुःखद हल्ला शेतकऱ्यांवर केला. शांती पूर्ण आंदोलनाने आपली बाजू मांडू शकतात. लखीमपूरमध्ये शांती पूर्ण धरणा करत होते. त्यावेळेस शेतकऱ्यांची हत्या झाली. याची जबाबदारी केंद्र सरकार आणि योगी सरकारची आहे. या मी घटनेचा निषेध करतो. याची चौकशी व्हावी. चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी होईल."

या प्राणघातक हल्ल्यावरून कळते की, भाजप ची नियत कशी आहे. शेतकऱ्यांचा आयव्हीज दाबण्याचा प्रयत्न होतोय. काही राज्यांच्या मुखमंत्री याना जाण्यापासून रोखले. संवेदना व्यक्त कारण्यापासून जाण्यापासून रोखले. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.

जे काही कारवाई होईल त्याला आमचा पूर्ण सहयोग असेल. शेतकरी वर्ग एकटा नाही. उत्तर प्रदेश सरकारकडून सत्तेचं गैरवापर.

मोदी सरकार चे मात्र मौन;

संवेनशील सरकार नाही. सरकार विरोधी आंदोलन झाले की ते सक्ती करतात. जालियनवाला बाग सारखी परिस्थिती. सरकारला आज नाही तर उद्या किमंत मोजावी लागेल.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT