कर्नाटकचे मुख्यंमंत्री शरद पवारांना अचानक भेटल्याने चर्चांना उधाण twitter/@PawarSpeaks
देश विदेश

कर्नाटकचे मुख्यंमंत्री शरद पवारांना अचानक भेटल्याने चर्चांना उधाण

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बंगळुरु येथे भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बंगळुरु : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) सध्या कर्नाटकात आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (karnataka cm Basavaraj S Bommai) यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांनी स्वतः या भेटीची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. या भेटीत कृषी, सहकार आणि पाणी या विषयांवर चर्चा झाल्याचं बोलंल जातंय. (sharad pawar meets karnataka cm in bangalore)

हे देखील पहा -

शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मी आज बंगळुरूमध्ये होतो. त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा मला फोन आला. त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचं पद पाहता मी त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी माझं चांगलं आदरतिथ्य केलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्य गेल्या अनेक वर्षापासून परस्पर सहकार्याने काम करत आले आहेत. त्यामुळे यापुढेही ही परंपरा कायम राहील अशी आशा आहे, असं शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एकीकडे शरद पवार देशपातळीवर भाजप विरुद्ध मोर्चेबांधणी करताना दिसतात तर दुसरीकडे ते अनेक भाजप नेत्यांनाही भेटत आहेत. 17 जुलै रोजी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर ३० जुलै रोजी रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. तसेच मागील आठवड्यात ३० ऑगस्ट रोजी नवे सहकार मंत्री अमित शहा यांचीही भेट त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या भेटींमध्ये नेमक्या काय चर्चा झाल्या याबाबत कळू शकलेले नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: चांदिवली विधानसभेत शिंदे गटाला धक्का; नसीम खान आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT