Swami Swaroopanand Saam Tv
देश विदेश

Swami Swaroopanand Passed Away : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन, ९९ व्या घेतला अखेरचा श्वास

शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचे वयाच्या ९९ वर्षी निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती(shankaracharya swaroopanand saraswati) यांचे वयाच्या ९९ वर्षी निधन झाले आहे. त्यांचे रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. द्वारका आणि शारदा पिठाचे स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरू म्हणून मानले जातात.

स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराज हे कोटी हिंदूंच्या श्रद्धेचे आधारस्तंभ आहेत. स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराजांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील जबरपूरजवळील दिघोरी गावातील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय असे होते. जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मप्रवास सुरू केला. या दरम्यान ते उत्तर प्रदेशमधील काशी येथे पोहोचले आणि ब्रम्हकालीन श्री स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून वेद-वेदांग तसेच धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले.

स्वातंत्र्यलढ्यातही शंकराचार्यांचे मोलाचे योगदान होते. १९४२ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी 'क्रांतिकारी साधू' म्हणून ते नावारुपाला आले होते. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याने त्यांना इतर क्रांतिकारांप्रमाणेच काशी येथील तुरुंगात ९ महिने तर मध्य प्रदेशातील तुरुंगात ६ महिने अशी शिक्षा भोगावी लागली होती.

स्वरुपानंद सरस्वती यांनी १९५० मध्ये दंड दिक्षा घेतली होती. शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून त्यांनी दंड दिक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले तर १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली. १९८२ मध्ये ते गुजरातच्या द्वारकाशारदा पीठ आणि बद्रिनाथच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य बनले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

Solapur Politics: उत्तम जानकरांनी खूप त्रास दिला, खोटे गुन्हे दाखल केले; मोहिते पाटील यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT