KSRTC Bus Viral Video
KSRTC Bus Viral Video Saam TV/ Twitter

संतापजनक! बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाला कंडक्टरने घातली लाथ; घटनेचा Video व्हायरल

बसमध्ये प्रवेश करत असणाऱ्या एका प्रवाशाला कंटक्टरने केलेल्या मारहाणीचा मन विचलित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Published on

बंगळुरु: बसमध्ये प्रवेश करत असणाऱ्या एका प्रवाशाला कंटक्टरने केलेल्या मारहाणीचा मन विचलित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधील हा धक्कादायक व्हिडीओ आहे.

KSRTC चा हा व्हिडीओ सध्या मोठ्या व्हायरल होत असून या व्हिडीओ बघणारा प्रत्येक जण कंडक्टवर कारवाई करण्याची मागणी करत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक प्रवासी बसमध्ये (Bus) प्रवेश करत असताना रागवलेला बस कंडक्टर या प्रवाशाला जोरात कानाखाली मारली त्यानंतर त्याच्या पोटात लाथ घालताना दिसतं आहे.

दरम्यान, कंडक्टरने मारलेल्या लाथेमुळे प्रवाशी रस्त्यावरती डोक्यावर पडल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे. मारहाणीपेक्षा धक्कादायक चित्र म्हणजे रस्त्यावरती पडलेल्या प्रवाशाला जागीच सोडून ही बस पुढे निघून जाताना दिसतं आहे.

दरम्यान, कंडक्टरने ज्या प्रवाशाला मारहाण केली आहे. तो दारु पिल्याचं दिसतं आहे. शिवाय कंडक्टरने या प्रवाशाला मारहाण का केली हे अद्याप समजलेलं नाही. व्हायरल होत असलेला व्हिडीओला आवाज नसल्यामुळे नेमकं त्या दोघांमध्ये काय संभाषण झालं हे देखील समजतं नाहीये.

या घटनेतील बस ही दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर बस डेपोमधील असल्याचं समजतं आहे. या घटनेची नोंद आता पुत्तूर बस डेपोमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना बुधवारी घडल्याचं समजतं असून एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ शूटींग करत तो सोशल मीडियावर पोस्ट केला असता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

KSRTC Bus Viral Video
मुंबईतील भाविकांचा ऋषिकेशमध्ये गंभीर अपघात; अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या प्रकरणानंतर कर्नाटकमधील नागरिकांनी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळावर सडकून टीका केली आहे. शिवाय घटनेमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या कंडक्टरवर कारवाई करण्याची मागणी देखील नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

तसंच या घटनेबाबत नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. घटनेतील कंडक्टरची चाचणी घेतली पाहिजे आणि संपूर्ण KSRTC टीमला अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांना कसं हाताळायचे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे असे काही नेटकरी म्हणत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com