Covid-19: कोरोनाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; जगात दर ४४ सेकंदात होतोय एकाचा मृत्यू; WHO ची धक्कादायक माहीती

WHO - World Health Organization | गेल्या आठवड्यात कोविड-19 मुळे दर ४४ सेकंदांना एक व्यक्ती मरण पावली आहे" अशी माहीती डॉ. घेब्रेयसस यांनी दिली.
Covid-19 News
Covid-19 NewsSaam TV

नवी दिल्ली: देशासह जगभरात कोरोना आटोक्यात येत असला तरी कोरोना (Covid-19) साथीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगात कोविड -१९ संसर्गामुळे दर ४४ सेकंदाला एका रुग्णाचा मृत्यू होत असल्याचा धडकी भरवणारा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO | World Health Organization) सादर केला आहे. म्हणजेच कोरोनाची लागण होऊन जगात दर ४४ सेकंदाला कुठे ना कुठे एक मृत्यू होतोय. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Dr Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी ही चिंताजनक माहीती समोर आणली आहे, त्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे. (Covid-19 Latest News)

Covid-19 News
Video: खासदार नवनीत राणांनी बाप्पाच्या मुर्तीसोबत काय केलं पाहा; शिवसेना नेत्या म्हणाल्या, हेच का यांचं हिंदुत्व?

पुढे ते म्हणाले, "यापैकी बहुतेक मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत. तुम्ही माझे म्हणणे ऐकून कंटाळले असाल की महामारी संपलेली नाही, पण हा विषाणू संपेपर्यंत मी ते सांगत राहीन." डब्ल्यूएचओ पुढील आठवड्यात सहा संक्षिप्त धोरणांचा एक संच प्रकाशित करेल, ज्यात सर्व सरकारे संक्रमण कमी करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतींची रुपरेषा दर्शवेल. थोडक्यात चाचणी, क्लिनिकल व्यवस्थापन, लसीकरण, संसर्ग प्रतिबंध, संसर्ग नियंत्रण, आणि इन्फोडेमिक्सचे व्यवस्थापन या आवश्यक घटकांचा समावेश केला जाईल" असं ते म्हणाले आहेत.

डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस म्हणाले की, "हा विषाणू असाच संपणार नाही. जागतिकपणे नोंदवलेल्या प्रकरणामध्ये आणि मृत्यूंमध्ये घट होत आहे. हे खूप उत्साहवर्धक आहे पण, हा ट्रेंड कायम राहील याची शाश्वती नाही. फेब्रुवारीपासून साप्ताहिक मृत्यूची संख्या ८० टक्क्यांहून अधिक घसरली आहे, परंतु तरीही गेल्या आठवड्यात कोविड-19 मुळे दर ४४ सेकंदांना एक व्यक्ती मरण पावली आहे" अशी माहीती डॉ. घेब्रेयसस यांनी दिली.

Covid-19 News
नाशिकमध्ये खळबळ! २ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या उद्योजकाचा मृतदेह सापडला; शरीरावर....

पुढे ते म्हणाले, "यापैकी बहुतेक मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत. तुम्ही माझे म्हणणे ऐकून कंटाळले असाल की महामारी संपलेली नाही, पण हा विषाणू संपेपर्यंत मी ते सांगत राहीन." डब्ल्यूएचओ पुढील आठवड्यात सहा संक्षिप्त धोरणांचा एक संच प्रकाशित करेल, ज्यात सर्व सरकारे संक्रमण कमी करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतींची रुपरेषा दर्शवेल. थोडक्यात चाचणी, क्लिनिकल व्यवस्थापन, लसीकरण, संसर्ग प्रतिबंध, संसर्ग नियंत्रण, आणि इन्फोडेमिक्सचे व्यवस्थापन या आवश्यक घटकांचा समावेश केला जाईल" असं ते म्हणाले आहेत.

डब्ल्यूएचओ प्रमुख डॉ. घेब्रेयसस पुढे म्हणाले, "आम्हाला आशा आहे की देश त्यांच्या धोरणांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सर्वात जास्त धोका असलेल्यांचे संरक्षण करण्यासाठी, ज्यांना त्याची गरज आहे त्यांच्यावर उपचार करतील आणि जीव वाचवतील. "साथीचा रोग नेहमीच विकसित होत असतो आणि प्रत्येक देशात असाच त्याला त्यानुसार प्रतिसाद असावा." मंकीपॉक्सबाबत, ते म्हणाले की "डब्ल्यूएचओ युरोपमध्ये संसर्गाचा आलेख कमी होताना दिसत आहे. घेब्रेयसस म्हणाले, गेल्या आठवड्यात अमेरिकेतून नोंदवलेल्या प्रकरणांमध्येही घट झाली आहे, परंतु त्या प्रदेशातील साथीच्या रोगाबद्दल ठोस निष्कर्ष काढणे कठीण आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, एकूण 52,997 लोकांना मंकीपॉक्स व्हायरसची लागण झाली आहे. गेल्या चार आठवड्यात नोंदवलेल्या केसेसपैकी 70.7 टक्के केसेस या यूएस आणि 28.3 टक्के युरोपमधून आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com