UP Road Accident ANI
देश विदेश

UP Road Accident: देवदर्शनाला निघाले पण वाटेतच काळाची झडप; ट्रक-बस अपघातात ११ भाविकांचा जागीच मृत्यू

Truck Turned Turtle On Bus: उत्तर प्रदेशमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अकरा लोकांचा मृत्यू तर १० जण जखमी झाले आहेत.

Rohini Gudaghe

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ११ भाविकांचा मृत्यू झालाय. ओव्हरलोड डंपर नियंत्रणाबाहेर जाऊन बसवर पलटी झाला. या अपघातामध्ये अकरा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयच्या हवाल्यानुसार मिळत आहे. बसमधील सर्व प्रवासी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथून उत्तराखंडमधील पूर्णागिरीला जात होते. शनिवारी (२५ मे) रात्री सव्वा बाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात १० भाविक जखमी झाल्याचं समोर येत आहे.

बसमध्ये प्रवास करणारे सर्व भाविक सीतापूर (UP Road Accident) जिल्ह्यातील कमलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जेठा गावातील रहिवासी होते. शाहजहांपूरचे एसपी अशोक कुमार मीना यांनी डीएनए इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, रात्री आम्हाला माहिती मिळाली की खुटर पीएस परिसरात एक बस उभी होती.पूर्णागिरीला जाणारे भाविक बसमध्ये बसलेले होते. तेवढ्यात रस्त्याने जाणाऱ्या एका ट्रकचा ताबा सुटला आणि तो ट्रक बसवर उलटला. यामध्ये एकूण ११ जणांचा मृत्यू झालाय. तर १० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Road Accident) आहे.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये जवळपास ४० प्रवासी होते. हे सर्वजण उत्तराखंडमधील पूर्णागिरी येथे देवी मातेच्या दर्शनासाठी जात (Accident News) होते. देवी मातेच्या दरबारात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सीतापूरच्या सिंदौली येथील भाविक दर्शनासाठी जात होते. हे सर्वजण खासगी बसने चालले होते. याबाबतची संपूर्ण माहिती शाहजहांपूर पोलिसांनी दिली आहे.

परंतु या भाविकांचं दर्शन अपूर्णच राहिलं. त्याअगोदरच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगातील ट्रक बसवर उलटला अन् भाविकांना चिरडलं. यामध्ये अनेक भाविकांचा जीव (Bus Truck Accident) गेला आहे. या अपघातामुळे या भाविकांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे सीतापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kitchen Tricks: भाजीला कट आणि गडद रंग हवा? मग हे खास स्वयंपाकघराचे ट्रिक्स वापरा

Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

Bollywood: प्रसिद्ध गायक अन् नेत्यावर भररस्त्यावर गोळीबार; चारचाकीवरून काढला पळ, नेमकं काय घडलं?

Aadesh Bandekar: आदेश बांदेकरांचं शिक्षण किती झालय? जाणून घ्या लाडक्या भावोजींचा प्रवास

Rajsthan Rain : राजस्थानात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे पूर; दोन जण गेले वाहून | VIDEO

SCROLL FOR NEXT