सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश; 'स्ट्रिपचॅट'द्वारे केले जात होते ब्लॅकमेल
सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश; 'स्ट्रिपचॅट'द्वारे केले जात होते ब्लॅकमेल Twitter
देश विदेश

सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश; 'स्ट्रिपचॅट'द्वारे केले जात होते ब्लॅकमेल

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील पोलिसांनी 'स्ट्रिपचॅट' द्वारे लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या सेक्सटॉरेशन रॅकेटच्या सदस्यांना अटक केली आहे अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने शनिवारी दिली आहे. शुक्रवारी या लोकांना अटक करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक (शहर) निपुण अग्रवाल यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की काही संशयित नग्न व्हिडिओ क्लिपद्वारे लोकांना ब्लॅकमेल करत होते.

पोलिसांनी आरोपींचे आठ बँक खाते सिल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पोलिसांनी सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश केला आणि दोन लोकांना अटक केली होती. त्यांनी दोन पीडितांनाही वाचवले होते.

एका साथीदारासोबत सेक्स टुरिझम रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुंबई विमानतळावर पोलिस अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून काम केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला The Immoral Traffic (Prevention) Act 2020 कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली. त्यामध्ये दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

"विमानतळावर सापळा रचण्यात आला होता जिथे तिन्ही मुली एका अधिकाऱ्याला आणि इतरांना भेटल्या ज्यांनी फसवणूक करणारे ग्राहक म्हणून काम केले. पैसे आणि विमान तिकिटाची देवाणघेवाण झाली, त्यांच्याकडून मिळालेल्या सिग्नलवर, टीमने तीन महिलांना पकडले," असे पोलिसांनी एका प्रेस नोटमध्ये सांगितले आहे.

सीआयएसएफ आणि विमानतळ पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपीला पकडण्यात आले. तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, जिथे तिने गुन्ह्याची कबुली दिली. नंतर, तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तिथे तिला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT