IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

IPS Anjana Krishna Controversy: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांच्या पदवीबाबत चौकशी करावी. त्यांनी कागदपत्रांमध्ये घोळ केला असावा अशी केली होती. मात्र आता त्यांनी यावरून यू-टर्न घेतलाय.
IPS Anjana Krishna Controversy
Amol Mitkari takes a U-turn in IPS Anjana Krishna case; apologizes after earlier demand for inquiry.Saam tv
Published On
Summary
  • अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल.

  • अमोल मिटकरी यांनी सुरुवातीला अंजना कृष्णा यांच्या चौकशीची मागणी केली.

  • त्यानंतर मिटकरी यांनी यू-टर्न घेत दिलगिरी व्यक्त केली.

राज्यात आयपीएस अधिकार अंजना कृ्ष्णा यांच्या नावाची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकार अंजना कृष्णा यांचे फोन संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजना कृष्णा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी थेट आयपीएस अधिकारी यांच्या शिक्षणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती. आता त्यांनी मिटकरी यू- टर्न घेतलाय.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

सोशल मीडियावर पोस्ट करत अमोल मिटकरी यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. सोलापूर घटनेसंदर्भात केलेली पोस्ट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती, तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलीस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे.

IPS Anjana Krishna Controversy
IPS अंजना कृष्णा प्रकरण पंतप्रधान मोदींकडे; कडक कारवाई करा,सुप्रिया सुळेंची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com