कैलास चौधरी
तुळजापूर: तुळजापूर Tuljapur शहरातील 23 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात Tuljapur Police Station पतीसह सासू, सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील पहा-
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील आरळी (खुर्द) येथील प्रिया घोडके हिचे तुळजापूर येथील पंकज घोडके याच्याशी एप्रिल 2021 मध्ये लग्न झाले होते. लग्नामध्ये दोन लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे प्रियाच्या वडिलांनी 40 हजार रुपये दिले व बाकी 1 लाख 60 हजार रुपये एक महिन्यात देण्याचे ठरले होते.
लग्न झाल्यानंतर हुंड्यात ठरलेली बाकीची रक्कम मिळत नसल्याने ते पैसे माहेरून आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून प्रियाचा शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. याला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद मृत पीडिता प्रियाचा भाऊ सुनील शिलवंत यांनी दिली आहे. यावरून तुळजापूर पोलीस ठाण्यात पती पंकज घोडके, सासरे राजेंद्र घोडके व सासू वनमाला घोडके यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.