आताच्या काळात डेटिंग अॅपवरती अनेक जण आपला पार्टनर शोधत असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा मुलीबद्दल सांगणार आहोत जिची स्टोरी वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. या मुलीने २१ दिवसांत तब्बल १५ मुलांना डेट केले आहे. या संपुर्ण गोष्टींचे आणि तिच्या अनुभवाचे कथन तिने आपल्या पुस्तकात केले आहे. महिलेने या डेटिंग दरम्यानचा आपला अनुभव सर्वासोबत शेअर केला आहे. २१ दिवसांत १५ मुलांना डेट करणारी ही महिला एक चांगली लेखक आहे. ती नेहमीच आपले डेटिंग अनुभव आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसोबत शेअर करत असते.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये राहणाऱ्या हेलेन चिक नावाच्या मुलीने आपल्या डेटिंग अनुभवावरती एक पुस्तक लिहीले आहे. तिने आपल्या पुस्तकात टिंडर या डेटिंग अॅपवरती खरं प्रेम कसं मिळवायचं याच्या काही टिप्सही दिल्या आहेत. या सर्व डेटिंगमध्ये तिला नक्की काय अनुभव आला, तिने काय गोष्टी अनुभवल्या याचा खुलासा तिने आपल्या 'Sex, Swipes and Other Stories' या पुस्तकामध्ये केला आहे.
टिंडरवरती असा मिळवा नवा पार्टनर
हेलेनने आपल्या पुस्तकात ऑनलाईन प्रेम झालेल्या नात्यामध्ये काय अडथळे येतात याबाबत सांगितले आहे. हेलेनने सांगितले की ती मागच्या काही दिवसांत न्युयॉर्क गेली होती. यादरम्यान तिने टिंडरच्या माध्यमातून २१ दिवसांत १५ जणांना डेट केले. तिने टिंडरच्या माध्यमातून कसे डेट केले याचा हे देखील पुस्तकात सविस्तर सांगितले आहे. हेलेन एक गोष्ट सांगितली की जर तुम्ही दुसऱ्या शहरात जाणार असाल तर तुमच्या फोनचे लोकेशन बदला म्हणजे तुम्हाला तिथल्या लोकांशी संपर्क साधता येईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लोकांना राईट स्वाईप- लेफ्ट स्वाईप करु शकता. हेलेनच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिचा दोन वेळा घटस्फोट झालेला आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.