NCP Mlas in Nagaland Support Ajit Pawar Saam Tv
देश विदेश

Breaking News: शरद पवारांना मोठा धक्का, नागालँडमधील सात आमदारांनी अजित पवारांना जाहीर केला पाठिंबा

NCP Mlas in Nagaland Support Ajit Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, नागालँडमधील सात आमदारांनी अजित पवारांना जाहीर केला पाठिंबा

साम टिव्ही ब्युरो

NCP Mlas in Nagaland Support Ajit Pawar: महाराष्ट्रानंतर नागालँडमध्येही शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील सात आमदारांनी अजित पवार गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार निवडून आले होते. आमदारांसह पदाधिकारी अजित पवार यांना पाठिंबा देणार असल्याने शरद पवार यांना राष्ट्रीय पातळीवर धक्का बसला आहे.

आपला पाठिंबा जाहीर करताना या आमदारांनी प्रतिज्ञापत्रही प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये लिहिलं आहे की, ''नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण राज्य कार्यकारिणी आणि जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी सखोल चर्चा व विचारमंथन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली नागालँडमध्ये पक्ष मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.''

''नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वानुंग ओडिओ यांना राज्य युनिटचा हा निर्णय राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचविण्याचा अधिकार देण्यात आला होता.''

याबाबत माहिती देताना राष्ट्रीय प्रवक्ते व राष्ट्रीय सचिव ब्रजमोहन श्रीवास्तव म्हणाले की, ''आज प्रदेशाध्यक्ष वान्युंग ओडिओ यांनी नवी दिल्लीत येऊन राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र सुनील तटकरे यांची भेट घेतली व नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाची माहिती दिली व आमदारांसह सर्व पदाधिकार्‍यांना पाठिंबा देण्याचे प्रतिज्ञापत्र सुपूर्द केले.'' (Latest Marathi News)

यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी नागालँड युनिटच्या पाठिंब्याबद्दल आनंद व्यक्त करत प्रदेशाध्यक्षांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले तसेच पक्ष मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले की, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पूर्वी नियुक्त केलेल्या नागालँड राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा युनिट्सना नेहमीप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tilgul Ladoo Benefits: थंडीत रोज एक तिळगूळ लाडू खा, कॅल्शियम वाढेल अन् हाडं होतील मजबूत

Indurikar Maharaj: 'मला बोला, माझ्या मुलीचा काय दोष?' ग्यान देणारे इंदोरीकर कीर्तन सोडणार?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी पात्रता काय? कोण करु शकणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी मुरलीधर मोहोळ घटनास्थळी पाहणी करणार

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव १२०० मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT