Dubai Accident News gulfnews
देश विदेश

Accident : ट्रकला मिनी बसची जोरात धडक, भीषण अपघातात ७ भारतीयांचा मृत्यू

Dubai Accident News : दुबईमध्ये ट्रक आणि मिनी बसच्या भीषण अपघातात ७ भारतीय कामगारांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यात थांबलेल्या ट्रकला बसची जोरदार धडक बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

दुबईत सोमवारी ट्रक आणि मिनी बसच्या अपघातात ७ भारतीयांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे रस्त्याच्या मधोमध अचानक थांबलेल्या ट्रकला मिनी बसने जोरात धडकली. या अपघातात सात भारतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दुर्दैवी अपघाताबाबत खेद व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "दुबईतील भीषण रस्ते अपघातामुळे आम्ही खूप दुःखी आहोत, यात अनेक भारतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे."

भारतीय दूतावास अपघातामधील भारतीय जखमींची सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. दुबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे संचालक, ब्रिगेडियर जुमा सालेम बिन सुवैदान यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार तांत्रिक बिघाडामुळे ट्रक अचानक रस्त्याच्या मधोमध थांबला. बस चालकाचे लक्ष विचलित झाले. बसला रोखण्यात चालकाला शक्य झाले नाही. त्यामुळे बस ट्रकला जाऊन पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यात काही भारतीय कामगारांचाही समावेश आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

५ जणांची प्रकृती अतिशय गंभीर

दुबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या अपघातात सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. तर चार जणांची प्रकृती स्थिर आहे. सर् ९व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमी भारतीयांची भेट घेतली. दूतावासाने म्हटले आहे की, "या कठीण काळात शोकाकुल कुटुंबांप्रति आमच्या मनःपूर्वक संवेदना आणि प्रार्थना आहेत."

अपघात नेमका झाला कसा?

ब्रिगेडियर जुमा सालेम यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात का झाला? याचा तपास केला जात आहे. ट्रक तांत्रिक बिघाडामुळे रस्त्याच्या मधोमध बंद पडली होती. बसने मागून ट्रकला धडक दिल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात भारतीय संविधान सेनेचे ‘संविधान जागर आंदोलन’; उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी

Cancer Reasons: कोणतंही व्यसन नसताना कॅन्सर का होतो? जाणून घ्या यामागची ७ महत्त्वाची कारणं

Dombivli Tourism : डोंबिवलीजवळ फिरण्यासाठी 'ही' आहेत ५ सुंदर पर्यटन स्थळे, वीकेंडला पावसात येईल मजा

राहुल- प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; काँग्रेस खासदारांचीही धरपकड

CJP च्या आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

SCROLL FOR NEXT