Senior BJP leader Kamlesh Chaube lost his life in a tragic road accident in Surajpur district after being hit by a speeding car. saam tv
देश विदेश

कार सोडून बाईकवर निघाले अन् रस्त्यातच भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं अपघाती निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Senior BJP Leader Kamlesh Chaube Accident News: सुरजपुर जिल्ह्यातील कुमडा-विश्रामपुर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात भाजपचे ज्येष्ठ नेते कमलेश चौबे यांचा मृत्यू झाला. धडक देणाऱ्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.

Omkar Sonawane

विश्रामपुर: येथील भाजपचे ज्येष्ठ नेते कमलेश चौबे यांचे बुधवारी सकाळी सुरजपुर जिल्ह्यातील कुमडा-विश्रामपुर रस्त्यावर झालेल्या रस्ते अपघातात निधन झाले आहे. या घटनेमध्ये आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर त्यांची कार झाडाझुडपांमध्ये अडकली असून कार चालक त्याठिकाणाहून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि भाजप नेत्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी कार जप्त केली असून ड्रायव्हरवर गुन्हा नोंदवला आहे.

कमलेश चौबे हे 60 वर्षाचे होते. त्यांचा किराणा आणि पान मसाल्याचा व्यवसाह देखील होता. बुधवारी सकाळी ते व्यवसायाच्या कामासाठी आपली दुचाकीवरून कुमडा-कासकेला येथे गेले होते. काम आटोपून विश्रामपुरला परत येत असताना, कुमडा रस्त्यावरील बाबा मस्तनाथ मंदिराजवळ मागून येणाऱ्या गाडीने त्यांच्या दुचकीला जोरदार धडक दिली. यामुळे कमलेश चौबे रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर विश्रामपुर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. जिथे त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदनानंतर, कुटुंबीयांनी पार्थिव अंतिम संस्कारांसाठी झारखंडमधील गरवा जिल्ह्यातील हसनदाग मेरल या त्यांच्या मूळ गावी नेले. दिवंगत कमलेश चौबे हे झारखंड भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष विनय चौबे यांचे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा संपूर्ण परिवार आहे. या अपघाताचे वृत्त समजताच भाजपच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला असून पक्षात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होताच महिलांची नवीन शक्कल; 'या' योजनांसाठी सुरू झाली अर्जांची लाट

Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन, 4,500 बसेस धावणार; दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

Veen Doghantali Hi Tutena Video : चोराच्या उलट्या बोंबा! अंशुमन चिंगीवरच करतो घाणेरडे आरोप; स्वानंदी सत्य कसं समोर आणणार?

Monsoon Update : पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सून धडकणार, राज्यात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा अंदाज

Hospital Fire : हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव! ICU वॉर्डात भयंकर आग, १० रुग्णांचा मृत्यू, अनेक जण गंभीर

SCROLL FOR NEXT