Maharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५ दिवसात मान्सून दाखल होणार, वाचा नेमका अंदाज काय?

Shruti Vilas Kadam

मान्सून आगमन

हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला असून, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Monsoon Rain | Saam Tv

बंगाल उपसागर

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Monsoon Rain | Saam Tv

अंदमान-निकोबार बेट

हवामान खात्याच्या माहितीनुसार, अंदमान-निकोबार बेटांमध्ये पावसाची सक्रियता वाढू लागली असून, लवकरच मान्सून अधिकृतपणे दाखल होऊ शकतो.

monsoon

गेल्या वर्षी

गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये मान्सून १३ मे रोजी दक्षिण अंदमानात पोहोचला होता. यंदाही जवळपास त्याच कालावधीत आगमन होण्याची शक्यता आहे.

Monsoon Rain | Saam Tv

केरळ

केरळमध्ये गेल्या वर्षी मान्सून तब्बल आठवडाभर आधी म्हणजे २४ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या एका दिवसात तो महाराष्ट्राच्या तळ कोकणात पोहोचला होता.

Monsoon Rain | Google

खरीप हंगाम

यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विशेषतः खरीप हंगामासाठी ही बातमी महत्त्वाची मानली जात आहे.

Monsoon Rain | yandex

हवामान विभाग

हवामान विभाग पुढील काही दिवसांत मान्सूनच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असून, पावसाबाबतचे पुढील अंदाज लवकरच जाहीर केले जाणार आहेत.

Monsoon Rain | Saam Tv

राज्यात कुठे किती तापमान

अहिल्यानगर: 43 , पुणे: 43.2 , छत्रपती संभाजीनगर: 43.6 , बीड: 44, जळगाव: 45.5 , कोल्हापूर: 38.7 , मालेगाव: 43.8 , नाशिक: 41.2, धाराशिव: 40.8 , परभणी: 43.1 , सांगली: 40.4 , सातारा: 41.7 , सोलापूर: 41.8 , अकोला: 45.6 , अमरावती: 46.4 , वर्धा: 44.2 , नागपूर: 40 , वाशिम: 43.4, बुलढाणा: 43.5 , चंद्रपूर: 42.2 , गोंदिया: 40.9

Summer | yandex

Alia Bhatt: आलिया भट्टचा ग्लॅमरस 'ड्रिमी बार्बी' लूक पाहून चाहते फिदा; कान्समधील फोटो तुफान व्हायरल

Alia Bhatt | Saam Tv
येथे क्लिक करा