Red fort delhi secretariat bomb threat high alert  saam tv
देश विदेश

Red Fort threats : लाल किल्ला, दिल्ली सचिवालय बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी; एका मेलनंतर सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर

Red fort delhi secretariat bomb threat high alert : शाळांनंतर आता लाल किल्ला आणि दिल्ली सचिवालय बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी इमेलद्वारे मिळाली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे. दोन्ही परिसर रिकामे करण्यात येत आहेत. पोलिसांकडून कोपरा न कोपरा पिंजून काढला जात आहे.

Nandkumar Joshi

लाल किल्ला (Red Fort) आणि दिल्ली सचिवालय बॉम्बने उडवून देण्यात येईल, अशी धमकी सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. खलिस्तानी गटाच्या नावानं सोमवारी हा इमेल आला आहे. त्यानंतर लाल किल्ला आणि दिल्ली सचिवालयाच्या परिसरात कसून तपासणी सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी, बॉम्बनाशक आणि शोधक पथक, श्वानपथक, अग्निशमन दलाची पथके परिसरात पोहोचली आहेत.

लाल किल्ला आणि दिल्ली सचिवालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली. पोलीस दल तात्काळ सक्रिय झाले. लाल किल्ल्याचा परिसर रिकामा करण्यात आला. शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. तसेच आयटीओच्या नजीक असलेल्या दिल्ली सचिवालयातील सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.

धमकीचा मेल कुठून आला? याचा तपास सायबर सेलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या गटाकडून यापूर्वी कधी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या आहेत, याचीही माहिती सायबर सेलकडून मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीतील दोन शाळांनाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी आज, सोमवारी सकाळी मिळाली होती. धौला कुआँमधील आर्मी पब्लिक स्कूल आणि लोधी रोडवरील एअर फोर्स बालभारती स्कूल या दोन शाळांना इमेलद्वारे धमकी देण्यात आली होती. पोलीस अधिकारी आणि दिल्लीची अग्निशमन यंत्रणा तात्काळ या ठिकाणांवर पोहोचली होती. दोन्ही शाळांचे परिसर तात्काळ रिकामे करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT