Jammu Kashmir Rajouri
Jammu Kashmir Rajouri Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir: बारामुल्ला चकमकीत एक दहशतवादी ठार; जंगलात शोध मोहीम सुरू...

Shivani Tichkule

Jammu Kashmir Terriost Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी वेळोवेळी शोध मोहीम राबवत आहेत. अशीच एक शोध मोहीम राजौरी येथे सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला येथे २ ते ३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान पाच जवान शहीद  झाले होते. यामध्ये एका लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

त्यानंतर आता उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील करहामा कुंजर गावात शुक्रवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. गावात दोन दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर त्यांनी संपूर्ण गावाला वेढा घातला. (Latest Marathi News)

जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट

चकमकीबाबत बारामुलचे एसएसपी आमोद अशोक नागपुरे म्हणाले, 'काही संशयास्पद हालचाली झाल्याची माहिती मिळाली. घेरावानंतर शोधमोहीम राबवण्यात आली आणि त्यादरम्यान आमच्या बाजूने गोळीबार करण्यात आला आणि त्यात एक दहशतवादी ठार झाला आहे. G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट आहे. सुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार त्यांना या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन सुरू असताना एक घरातून अचानक गोळीबार सुरू झाला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. हा दहशतवादी लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.

४८ तासांत दहशतवाद्यांशी झालेली दुसरी चकमक

जेव्हा सुरक्षा दल लपलेल्या दहशतवाद्यांजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. गेल्या ४८ तासांत बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांशी झालेली ही दुसरी चकमक आहे. गुरुवारी क्रेरी भागात दोन दहशतवादी मारले गेले. या परिसरात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता असून शोध मोहीम सुरू आहे.

जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु

बारामुल्ला परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन जारी करण्यात आलं आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. कुंजर परिसरात सुरक्षा दलाने घेराबबंदी केली आहे. ऑपरेशन त्रिनेत्र असं याला नाव देण्यात आलं. 23 तास हे ऑपरेशन सुरू आहे. घनदाट जंगल, गुहा असल्याने दहशतवादी याचा आधार घेत आहेत. आजही हे सर्च ऑपरेशन सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पाच जवान शहीद झाले

याआधी शुक्रवारीच जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. जखमी जवानावर अद्याप उपचार सुरू आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये हिमाचल प्रदेशातील दोन, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

SCROLL FOR NEXT