Amravati Crime: चरित्राच्या संशयावरून पत्नीचा खून; विलायतपुरा येथील धक्कादायक घटना

चरित्रावर संशय घेत पतीने आपल्या पत्नीला दगडाने ठेचून जीवनाशी ठार केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरातील विलायतपुरा येथे घडली आहे.
Crime News
Crime NewsSaam TV

अमर घटारे

Crime in Amravati: चरित्रावर संशय घेत पतीने आपल्या पत्नीला दगडाने ठेचून जीवनाशी ठार केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरातील विलायतपुरा येथे घडली आहे. चरित्रावर संशय घेत पती आणि पत्नी दोघांमध्ये वाद झाला. यात रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला दगडाने ठेचून जीवनाशी ठार केला आहे. (Latest Marathi News)

Crime News
Karnataka Election 2023: सभा न घेताच प्रणिती शिंदेंना माघारी परतावं लागलं; कर्नाटकात नेमकं काय घडलं?

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन मृतक पत्नीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) पाठवले आहेत. तर आरोपी पतीला पोलिसांनी अटक करीत त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. या संदर्भात अधिक तपास अचलपूर पोलीस करीत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पतीला जेवणाचा डबा नेऊन द्यायला गेलेल्या पत्नीच्या चारीत्रयावर संशय घेत पतीने दगडाने ठेचून पत्नीची हत्या केली. स्थानिक विलायतपुरा भागात शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली. (Amravati Crime News)

Crime News
Auto Rickshaw Unique Offer: ‘The Kerala Story’ चित्रपट पाहण्यासाठी महिलांना मोफत रिक्षासेवा! डोंबिवलीतल्या रिक्षा चालकाची अनोखी ऑफर

शेजारील लोकांना घरातून किंचाळण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी घरात जाऊन बघितले असता पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. स्थानिक लोकांनी तात्काळ अचलपूर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आरोपीला अटक केली.

हत्या करणारा आरोपी हा बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे. तर पत्नी ही मूळची अचलपूरची असल्यामुळे तो अचलपूरला राहायला आला होता. त्याला दारू आणि गांजाची वाईट सवय लागली होती. स्थानिक विलायपुरा भागात तो भाड्याच्या घरात राहत होता. पत्नी परतवाडा येथील कपड्याच्या शोरूम मध्ये काम करीत होती. मृत महिलेस एक 16 वर्षाचा व 14 वर्षाचा असे दोन मुले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com