Karnataka Election 2023
Karnataka Election 2023Saam Tv

Karnataka Election 2023: सभा न घेताच प्रणिती शिंदेंना माघारी परतावं लागलं; कर्नाटकात नेमकं काय घडलं?

Praniti Shinde News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभातील घडामोडींना वेग आला आहे. बेळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

Karnataka Assembly Election 2023: सध्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे जोरदार प्रचाराच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काही नेते देखील प्रचारासाठी बेळगावमध्ये जात आहेत. देसुर येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ही सभा उधळून लावल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Karnataka Election 2023
Auto Rickshaw Unique Offer: ‘The Kerala Story’ चित्रपट पाहण्यासाठी महिलांना मोफत रिक्षासेवा! डोंबिवलीतल्या रिक्षा चालकाची अनोखी ऑफर

प्रणिती शिंदे यांना माघारी परतावं लागलं

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसह मराठी भाषिक सभास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत सभा उधळून लावली. बेळगाव जवळच्या देसूर गावात प्रणिती शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेत भगवे ध्वज घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य घुसले. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं ग्रामस्थांचा विरोध पाहून सभा न घेताच प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना माघारी परतावं लागलं. (Karnataka Election 2023)

Karnataka Election 2023
Sharad Pawar News: शरद पवारांच्या मागे बसलेली ती तरुणी कोण? पहाटेच्या शपथविधीवेळी केलं होतं महत्वाचं काम

एका टप्प्यात होणार मतदान

कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. त्याआधी कर्नाटकात 10 मे रोजी एकूण 224 जागांसाठी मतदार पार पडणार आहे. तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. सत्तेत येणाऱ्या पक्षाकडे 113 आमदारांचं संख्याबळ असणं गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com