अभिजीत देशमुख
Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवली परिसरात 'द केरला स्टोरी' या चित्रपटासाठी एका रिक्षा चालकाची महिलांसाठी खास ऑफर आहे. कल्याण डोंबिवली परिसरात असलेला चित्रपट गृहात हा पिक्चर पाहण्यासाठी जायचे असल्यास या महिलांना रिक्षा प्रवास मोफत देणार असल्याचं या रिक्षा चालकाने जाहीर केलं. (Latest Marathi News)
गणेश म्हात्रे असे रिक्षा चालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे गणेश ने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा (Movie) ट्रेलर पाहिला होता या चित्रपटाच्या कथानकाने प्रभावित होऊन हा चित्रपट प्रत्येक महिलांनी पाहावा यासाठी त्यांना माझ्या वतीने रिक्षा प्रवासाची सोय मोफत करून दिल्याचे गणेशने सांगितले. गणेश ने आपला रिक्षावर या आशयाचा बॅनर लावत आपला मोबाईल नंबर देखील रिक्षावर छापला आहे सध्या त्याच्या रिक्षाचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होतो. (Dombivli News)
पुण्यातील ऑटोरिक्षा चालकाची खास ऑफर
पुण्यातील (Pune) एका रिक्षाचालकाने हा चित्रपट पाहायला जाणाऱ्यांसाठी मोफत रिक्षासेवा देणार असल्याचे जाहीर केले आहे. या रिक्षाचालकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्याती आळंदी येथे राहणारे रिक्षाचालक साधू मगर यांची ही रिक्षा असल्याचे समोर आले आहे. 'द केरळ स्टोरी' हा चित्रपटा पाहायला जाणाऱ्या लोकांना आपण मोफत सेवा पुरवणार असल्याचे पोस्टर साधू मगर यांनी आपल्या रिक्षाच्या मागे लावले आहे. साधू मगर यांचे हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
‘द केरला स्टोरी’ला वादाची किनार, उच्च न्यायालायाने केले महत्वपूर्ण भाष्य
‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून बऱ्याच प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. हा चित्रपट 5 मे पासून अर्थात आजापासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सोबतच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाविरोधात आक्षेपार्ह काहीही नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.